नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पीक
कोरडवाहू शेतीमधल्या
करपुन गेल्या पिकासारखा
तुझा चेहरा सुरकटलेला
पायांवर गोंदवून नक्षी
नशीब झाल्या स्थावर भेगा
पाऊस केवळ डोळ्यांमध्ये
येतो वांझपणाचा रिमझिम
नंतर दुष्काळाचा हृदयी
मुक्कामच ठरलेला कायम
बैलमनाला अन्यायाच्या
वखराला जुंपुन ठेवावे
कर्जबियाणे व्याजसरीतून
उधळत झाकत पेरत जावे
दगड भिरकवावा मोठासा
स्वप्नकल्पनापक्ष्यांवरती
पोटाला लावावे गोटे
भरुन बिडीने घ्यावी छाती
असा तुझा हा नगण्य दिनक्रम
सहज सुखेश्वर दुर्लक्षिततो
अश्रुंविण ये दु:खाचे पिक
काळाविण वेळेची टिकटिक!
~ राजीव मासरूळकर
दि.08/11/2014
सकाळी 8:30 वा
प्रतिक्रिया
मस्त
मस्तमस्त
धन्यवाद, सुगतजी !
धन्यवाद, सुगतजी !
राजीव मासरूळकर
सुंदर कविता.
माझ्यासारख्या नवकविने अभ्यासण्या जोगी.
अश्रुंविण ये दु:खाचे पिक
काळाविण वेळेची टिकटिक!
हेमंत साळुंके
पाने