नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुष्काळ
वठल्या झाडाला आता,नव्याने तू पालव रे
आम्हा गरिबावर देवा,करुणा तू दाखव रे.......
आभाळाचा रुसवा झाला दुष्काळी तेरावा,
निजलेल्या आभाळाला,थोडेसे तू जागव रे......
गाईच्या पोटासाठी थोडा हिरवा चारा दे
तान्ह्या माझ्या बाळाला,प्रेमाने तू वागव रे........
कष्टाचं फळ केव्हाचे,पदरात पडेना माझ्या,
आतापुरते जेवण करण्यास चुलीला पेटव रे.......
माझ्या गात्रा गात्राला,थेंबा थेंबाने भिजव रे,
वरुणाला जमिनीवर तू,माझ्यासाठी पाठव रे......
आम्हा गरिबावर देवा,करुणा तू दाखव रे,
वरुणालाही खेळू दे ना मेघाशी तांडव रे
........शीतल सुर्यवंशी
(सध्या गझल लिहिण्यास ....शिकण्याचा पर्यत्न चालला आहे.त्यातली हि माझी दुसरी गझल(विधाता वृत्त)
सही काफिये लिहिणे मला जमत नाही
चुका शोधते माझ्याच ज्या पटत नाही ......
मला जे पसंद अता ते मी लिहित आहे,
प्रिया,प्रेम ह्या विषयात मी रडत नाही.......शीतल सुर्यवंशी
प्रतिक्रिया
छान प्रयत्न.
छान प्रयत्न.
शेतकरी तितुका एक एक!
पाने