पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकऱ्याची व्यथा
~~~
आम्हा शेतकऱ्यांवरी सदा रुसला पाऊस कसा पिकवू कापूस पाण्याविना ||१||
कष्ट करून करून झाली या हाडांची झीज कधी होईल हो चीज प्रयत्नांचे ||२||
वावरात गाळतो मी माझ्या रक्ताचाही घाम कधी मिळणार दाम श्रमांना या ||३||
लेक शिकावी म्हणून घर ठेवलं गहाण नाही पायात वहाण कधी माझ्या ||४||
आम्हासाठीच्या योजना नेत्यांच्या पोटात जाई माझे पोट मात्र राही उपाशीच ||५||
कधी होईल माझी या दुःखांपासून सुटका मिळेल दोन घटका सुख थोडे ||६||
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.