पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
नाते ऋणानुबंधाचे..
ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगताना पुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!
का उठती रोमांच? अलगद स्पर्श होता ते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!
गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणे शहारते पाकळी, पतंग खेळताना ......!
अस्पर्श रक्षिलेला, जपून जतन ठेवा ते हृदयही कंपित, तार छेडताना ......!
स्पर्श उत्कटतेचे, सख्यांस बळ देते तन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!
फेकुनी दूर अभये, शाल काळोखाची रजनी लेत लाली, भानू उगवताना...!
गंगाधर मुटे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.