पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
बायोडाटा..!!
जीवाचा आटापिटा हाच त्यांचा बायोडाटा .....॥१॥
चोचीत मिळण्या तृणवत काडी फ़िरवित पंख रान पछाडी .....॥२॥
तृणकाड्यांची गुंफ़ण करुनी खोपा विणला लक्ष धरुनी .....॥३॥
कोणती विद्या? गुरू कोणता? घरटे बांधणे शिकवीत होता .....॥४॥
कसे उडावे किती उडावे कसे उमजले कोणा ठावे .....॥५॥
करुनी फ़डफ़ड प्रयास करणे हव्यास धरणे निरंतर धरणे .....॥६॥
गवसून घेतो स्वयेच वाटा तोच त्यांचा बायोडाटा .....॥७॥
गंगाधर मुटे ....................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.