नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनविभाग : पद्य कविता
ओटी रिकामी भरते ...
एका एका दाण्यासाठी
बाप मनात झुरते
जरी अनवाणी पाय
माय शिवार फिरते...
भुई आतून फाटते
उरी हुंदका दाटते
डोई आगीवाणी ऊन
रानीं रगात आटते ...
कळ भूकेची पोटात
गाणी मातीची ओठात
कधी दुष्काळ मारते
कधी आभाळ तारते ...
दाटे काळेभोर ढग
सुरू होते लगबग
दाणे मातीत रुजते
बाप नभाला पूजते ...
पिक वाऱ्यासंगे डोले
माय पाखरांस बोले
रान हिरवं फुलते
मन अंबरी झुलते ...
साथ बैलांची जोडीला
अशा वंगाळ घडीला
बाप तिफन धरते
ओटी रिकामी भरते ...
सचिन शिंदे
मु.मुरली पो. जेवली
ता.उमरखेड जि. यवतमाळ
8421527542
9049517832
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने