नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बैल वीनवणी
हाय माहीत आमा दोघासबी
घालमेल व्हतीया तुमच्या जीवाची जी,
आपण मीळुन सार बाजुला सारू
पर मालक तुमी आत्महत्या नग करू.(1)
नाय दाखवीनार आमी ऐट शींगाची
राबु होईस्तवर लाही लाही अंगाची,
तुमच्याजीवापायी आमी लढू अन् मरू
पर मालक तुमी आत्महत्या नग करू.(2)
दिवसरात्ररात्र नांगर मानवरून वाहु
वाळलेल्या चार काड्याबी आनंदान खाऊ,
कष्टाण आपल्या या परस्थीतीला हारऊ
पर मालक तुमी आत्महत्या नग करू.(3)
नग लोणी अन हळद खांदी मळायाला
आरामबी नग आमास पोळ्याला,
झुल अन बाशींग गतवर्षीचच वापरू
पर मालक तुमी आत्महत्या नग करू.(4)
आमा ना उमगे जोड शब्दाची
पर भाषा कळतीया तुमच्या मनाची,
आयुष्यभर राहु बनुन तुमच लेकरू
पर मालक तुमी आत्महत्या नग करु.(5)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने