नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वतंत्र कर तू बापा
तू जागा हो...तू जागा हो...
तूच तुझारे वाली कर्जाच्या ओझ्याखाली
जिंदगानी तुझी रे दुःख हे दरसाली
तू जागा हो...तू जागा हो....।।धृ।।
कसतो शेती तू जोमाने कष्ट करून फार
तोंडी घास येता तुझी स्वप्नेच होती ठार
जिवापल्याड जपुनी पिका मोल काय आहे
ठरलेल्या त्या शब्दांचे आज बोल काय आहे
नाटकी डाव खेळुनी रंगत आणली जाते
फाटकी झोळी घेऊनि संगत मानली जाते
झुट्या आश्वासनांनी पंगत ताणली जाते
तू जागा हो... तू जागा हो..... ।।1।।
गणित नाही खर्चाचे त्या भाव ठरविले जाते
हमीभावाच्या ओझ्याखाली तुला लोळविले जाते
कर्ज घेऊनी डोईवरती लाखो जीव ते गेले
आखुनी धोरणे कुचकामी ते सांगा काय केले
असल्या या धोरणापायी घेतला गळ्या फास
नव्या संशोधनाची लागली जीवा आस
घामाच्या धारेवरती भोगला वनवास
तू जागा हो... तू जागा हो..... ।।2।।
नको घाबरू कुणा आता लेखणी घे तू हाती
कुचकामी या धोरणांना पुरवू नकोस माती
लढा लढूनी हक्काचा स्वतंत्र कर तू बापा
शेती धोरणे नवे आखुनी मार्ग कर तू सोपा
धार देऊनी आता शब्द तू मांड नव्याने
जागे होतील सारे एकजुटीच्या भयाने
उगवतील मग ते सारे सारे सुपीक बियाणे
तू जागा हो.. तू जागा हो..... ।।3।।
- रंगनाथ तालवटकर
(वर्धा)