नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*मांडवदारातला बाबा*
ते वेल्हाळ लाघवी बोल बोबडे
बाबा आठवतो आज पुन्हा पुन्हा;
इवल्या इवल्या पाऊलखूणांच्या
जणू शोधत जातोय खाणाखुणा।।
झिम्माड हसे अन् खेळे अंगणी
मनाच्या कोपऱ्यात बसे रुसून;
ऋतूच्या झुल्यावर झुलता झुलता
गोड हसे हिरवा शालू नेसून ।।
जरी नसे राजा कुठला कुणी तो
पण लेकीस म्हणे राजकुमारी;
मेंदीच्या रंगास म्हणे अर्थ तेंव्हा
जेंव्हा लेक नटली मांडवादारी ।।
"अहो, लेक म्हणजे परके धन "
बाबा सांगतसे आईला हसून;
मात्र लेकीला कळते आपोआप
बाबा रडतोय मोठ्ठयाने आतून ।।
जाऊ दे खुशाल सांगू दे वरवर
लेक म्हणे असे परक्याचे धन;
डोळ्यात खोलवर पाहता दिसते
धाय मोकलून रडणारे बापाचे मन ।।
निशब्द अश्रू असे ठेवतो गोठून
बालपण तिचे आले मनात दाटून;
चिमणे भुर्रकन.... जा ग उडून
म्हणताना बाप रडे ऊर फाटून।।
************************************************************* ( किरण शिवहर डोंगरदिवे,
वॉर्ड नं 7, समता नगर , मेहकर
पो. मेहकर ता. मेहकर
जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
email kdongardive@gmail.com)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!