नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
२. चीर कातडी अन्यायाची*
अंधश्रद्धचे इथे श्रद्धेवर होतात रोज बलात्कार
राम रहीम ढोंगी येथे करतात रोज चमत्कार.
अंध अध्यात्माने भोळ्याभाबडया भक्तांची होतेय लूट
जमविण्या माया ऐयाशी लंपट करतात एकजूट.
भूलविले जातेय संप्रदायाच्या विळख्यात देव शोधतांना
पायदळी तुडवितात भावनांना संधीसाधू पोळी भाजतांना.
माणसात आहे देव खरा जाण मानवता ही श्रेष्ठ
स्वार्थासाठी चोर भामट्यांनी केली आहे नितीमत्ता भ्रष्ट.
अगाध महिमा निती संस्कृती थोर ती भारत भूची
जाळूनी जुलमांना न्यायाने चीर कातडी अन्यायाची.
- *प्रा. राजेंद्र गवळी*
कुकाणा ता. नेवासा जि. अहमदनगर
*