नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
धर्माच्या पंथाच्या ना जातीच्या पातीच्या
जागर करूया कवितांचा शेतीच्या मातीच्या
जसा लागला क्रांतीकारी शेतीचा शोध
मानवतेला कळू लागले हिरवे संबोध
नव्या जाणूया गोष्टी विश्वाच्या सुरुवातीच्या
कुणबी इमानी काळ्या आईचा चाकर
घामाने मिळते त्याच्या दुनियेला भाकर
गोष्टी कष्टाळू निधड्या कुणब्याच्या छातीच्या
कधी वाटतो कणखर केव्हा होतो भावूक
शेतीमध्ये हरते त्याची तहान नी भूक
कथा उन्हाच्या थंडीच्या आणि बरसातीच्या
शेतकरी शोभतो खरा दुनियेचा पोशिंदा
थांबत नाही तो कोणी वंदा कोणी निंदा
व्यथा जोजवूया त्याच्याही वाताहातीच्या
कधी निसर्गाचे केंव्हा सरकारी थैमान
व्यथा वंचनांमुळे नेहमी कुणबी हैराण
हिरव्याहिरव्या जखमा त्याच्या हिरव्या पातीच्या
◾चंद्रकांत देवराव कदम (सन्मित्र)
नांदेड
मो.9921788961
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.