नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कुणाला सुखाचा तर कुणाला त्रासदायक पाऊसाच तस इतरांना इतर वेळी त्याची आपल्यासाठी अस्तीतित्वाची जाणीव न होणे हे साहजिक मात्र, बळीराजाचा आयुष्यातील मौल्यवान क्षण म्हणजे रानात पडणारा पाऊस. स्वतःचा मालाला बाजारपेठ भाव कितीही मिळो शेतातील पिकाने जगाची भुक भागणार ह्याची जाणीव ठेवून तोट्यातील शेतीला आपल्या चेहऱ्यावर आनंदाने, अभिमानाने घेऊन मिरणारा माझा श्रीमंत बळीराजा.
खेड्यात एक म्हण रुजलेली आहे, "ओला दुष्काळ पडावा पण, कोरडा दुष्काळ पडू नये" यातूनच रानातील पाऊसच महत्त्व अधोरेखित होते. देश असो की जागतिक पातळी रानातील पाऊसाची सर जगवते, जगवित असते एवढेच.
वारकऱ्यांना जशी विठ्ठल भेटीची ओढ तशी बळीराजाला रानातून आभाळाकडे पाऊस पडण्याची ओढ, ही ओढ ताटातूट करणारी नसावी हीच माऊली चरणी प्रार्थना
रानातील पाऊस बळीराजाचा आयुष्यात कायम सुखाचा असो, त्या अभावी मनातील आभाळ भरून डोळ्यात पाऊसाची सर न येवो. अपेक्षांचा ओझ उतरवणारा, सुखाचा क्षितिज ओलांडणार हा पाऊस बळीराजाचा आयुष्यात शिंपल्यातील मोत्याप्रमाणे अनमोल, वैभवसंपन्न, सुखकारी दैदिप्यमान बनवत राहो.
प्रतिक्रिया
"शिंपल्यातील मोती"
"शिंपल्यातील मोती"
Ganesh
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
आभार
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मुटे सर जी....
Ganesh Varpe