![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*ये असा रस्त्यावर* (वर्हाडी)
भूल आता किसाना जातपात धरम
ये असा रस्त्यावर, सोड लाज शरम ॥धृ॥
तू घेतं तूर गहू ऊस सोया कापूस,
काटकूट करून तुह्या हाती टिपूस
पिकलं तवा लुटा, शासनाचं धोरन ॥१॥
चोर डाकू गुंड मारून राह्यले डल्ला,
व्यापारी दलाल भरून राह्यले गल्ला
राजकारणी पुढारी झाले बेशरम ॥२॥
कर्मचारी घेते सदा महागाई भत्ता,
निसर्ग मारे तुले, शासन देते बुत्ता
सम्दे झाले कडक,तू राह्यला नरम ॥३॥
आपसातली नष्ट कर तू आता दुरी,
शत्रू अन मित्राची कर पारख खरी
कोनता होये बिबा न कोनती खुरम ॥४॥
पक्ष असो कोनता फरक ना नेत्यांत,
धोरनापायी त्याहिच्या तू आला गोत्यात
आतातरी त्याहिचे जानून घे करम ॥५॥
बांध बरं मुठा,सांग सार्याहिले यंदा,
शेती दुसरं नाही, हाये उद्योगधंदा
कमी कर कर्मकांड अन् देवधरम ॥६॥
जोशी सायबाचे आठव सारे उपाय,
त्याच्याबिना दुसरा नाही तरनोपाय
शासनाचं धोरन, किसानाचं मरन ॥७॥
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
खुशाल दादाराव गुल्हाने,
गोकुळ काॅलनी,साईनगर, अमरावती-444607
भ्रमण.9403019795