नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
.
येरे पावसा ये रे, डोळे नभाकडे लागले l
सरसर येऊनी कर धरतीला चिंब ओले l l तव आगमनाने बळीराजाने धरतीला दान बीजाचे केले l
तुझ्या स्वागता बीजातून त्या बघ अंकुरही वरती आले इवली इवली रोपे पावसा किती वाट तुझी पाहते l
ढगालाच बघून नुसते ,हर्षित बघ ते होते.!!
पण दडी मारून हाय पावसा काय तु रे केले.!
उगवलेले अंकुर नवे बघ कसे सुकून गेले.!!
सारी सृष्टी आहे पावसा तुझी रे तहानलेली.!
तुझ्यासाठी बघ कशी ती सारी व्याकूळ झाली !!
बळीराजा ही निराश झाला वाट तुझी पाहता !
जीव जाईल त्याचा पावसा कोसळ तरी आता !!
रचना:-
विनायक अंगाईतकर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने