![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
देते मनाला उभारी
धुंद पावसाळी हवा..
हळू कानात सांगते
अर्थ जीवनाचा नवा
शाल ओढुन हिरवी
आला डोंगराला थाट..
आत झिंगत चालली
नाग मोडी पायवाट
घट्ट पायाला बिलगे
तृण पात्यातील दवं..
तृप्त कानाला करतो
पाखरांचा गुंजारवं
असे ऊन पावसाचे
रुप पालटे क्षणात..
पाना पानातुनी जणू
येती हायकू मनात
दुर घाट माथ्यावरी
वारा वाजवितो पावा..
चिंब ओलत्या अंगाने
घुमे रानात पारवा
सारी सृष्टीची किमया
दाटे शिवारी गारवा..
अशा धुंद सांजवेळी
हात तुझा हाती हवा
©️ दिवाकर जोशी.
प्रतिक्रिया
या हवेची तर वाट बघतो
धुंद पावसाळी हवा..
हळू कानात सांगते
अर्थ जीवनाचा नवा
अप्रतिम रचना,
पावसाळी हवा खुपच छान सर.
पावसाळी हवा खुपच छान सर.
l विहंगम काव्य रचना ...
धुंद पावसाळी हवा...
छानच...
Narendra Gandhare
पावसावरील सुंदर अष्टाक्षरी
पावसावरील सुंदर अष्टाक्षरी रचना
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने