![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! '
अर्थनीतीला देती गती अन् करोनापासून मुक्ती !...... ।।धृ।।
करोनाने कोविडचा केलाय कहर कित्ती कित्ती !
शेतकरी बांधवा, मुखपट्टी बांधून कर शेतीभाती
घे सोबतीला मुखपट्टीधारी शेतमजूर, नातीगोती
करोनायोद्धे बनून पिकवा देशासाठी हिरेमोती !
' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! '
अर्थनीतीला देती गती अन् करोनापासून मुक्ती !...... ।।१।।
बळीराजा, तुझी माता भोळीभाळी, काळी माती
सेवा कर तिची घेऊन ट्रॅक्टर किंवा नांगर हाती
जरी असली साथीला करोना साथीची अती गती
करोनी आधुनिक शेती, अरे, ' करोना ' आर्थिक प्रगती !
' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! '
अर्थनीतीला देती गती अन् करोनापासून मुक्ती !...... ।।२।।
ठेव मनात, वारंवार हात स्वच्छ धुण्याची मती
ठेव जनात, योग्य शारीरिक अंतर राखण्याची नीती
ठेव कानात, नाकातोंडाला मुखपट्टी लावण्याची सक्ती
ठेव ध्यानात, या तीन युक्तियुक्त उक्तींच्या पंक्ती !
' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! '
अर्थनीतीला देती गती अन् करोनापासून मुक्ती !...... ।।३।।
बाळगू नकोस शेतीपती, करोना - कोविडची अती भीती
शेती शेतकऱ्याची शक्ती ! कृषी कृषीवलाची भक्ती !
देई शक्ती अर्थप्राप्ती ! देई भक्ती अर्थतृप्ती !
करे शक्तियुक्त भक्ती, कृषकाला महान व्यक्ती !
' शक्तियुक्त भक्ती अन् युक्तियुक्त उक्ती ! '
अर्थनीतीला देती गती अन् करोनापासून मुक्ती !...... ।।४।।
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !
धन्यवाद !
आपला विनम्र विनीत ,
महान चव्हाण
MAHAAN CHAVAN
पुनश्च धन्यवाद HTML चे !
पुनश्च धन्यवाद HTMLचे
मुटे सर, आपण माझ्या 'धन्यवाद!' या प्रतिसादाचे कौतुक केलेत, याबद्दल पुनश्च धन्यवाद! पण सर, ही किमया दोन प्रकारच्या HTML मुळे घडली. त्यातील पहिले जगप्रसिद्ध HTML म्हणजे Hyper Text Markup Language आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख. ( संदर्भ : - बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग : लेखक - गंगाधर मुटे : दिनांक २०-१०-१९ )
आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही बळीराजाला तंत्रस्नेही
( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून माझा स्वानुभव प्रात्यक्षिकासहित माझ्या ' धन्यवाद ! ' या प्रतिसादाच्या स्वरूपात मी आपणा सर्वांसमोर सादर केलेला आहेच !
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
आणि दुसरे HTML म्हणजे H -
आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख.

हाच पूर्ण प्रतिसाद ''बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग ; दिनांक २०-१०-१९'' या धाग्यावर टाकावा.
शेतकरी तितुका एक एक!
' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! '
' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! '
बळीराजाला तंत्रस्नेही
( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता ' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ' अशी ख्याती झालेली आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही सध्या आपण का खंडित केली आहे ? आम्ही आपल्या नवनवीन लेखांची खूप आतुरतेने आणि मोठ्या उत्सुकतेने वाट पहात असतो.
आपला रसिक वाचक,
महान चव्हाण
MAHAAN CHAVAN
व्हाटसप ग्रुप
ज्यांच्यासाठी ही कार्यशाळा मी सुरु केली होती त्यांनाच यात फारसा रस नसल्याने आता माझे दुर्लक्ष होत आहे.
ही कार्यशाळा मुळात एका व्हाटसप ग्रुपवर सुरु झाली होती. तिथेच सर्व आधीचे लेखन झाले व ते नंतर मी बळीराजावर टाकले.
आता त्या ग्रुपवरील लोक पुढील तंत्रज्ञान शिकायला तयार दिसत नसल्याने माझा उत्साह स्वाभाविकपणे कमी झाला आहे.
आपली इच्छा असल्यास आपण त्या ग्रुपवर सामील व्हावे. म्हणजे पुढे काही करता येईल.
https://chat.whatsapp.com/KcGncFCk2XcEMAE5N6IrFy
शेतकरी तितुका एक एक!
पाने