Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***IT कार्यशाळा - मोबाईलसाठी काही महत्वपूर्ण ऍप्स - भाग-९

IT कार्यशाळा - मोबाईलसाठी काही महत्वपूर्ण ऍप्स - भाग-९ 
calender
 
१) गुगल कॅलेंडर - या ऍपचा वापर कॅलेंडर सोबतच दिनदर्शिका/रोजनिशी आणि घड्याळ्याच्या अलार्म सारखा तिहेरी वापर केला जाऊ शकतो. दिवसाचे कामाचे शेड्युल, आठवड्याचे कामाचे नियोजन तसेच वर्षभरातील वेगवेगळे नियोजित समारंभ, वेगवेगळे सण, लग्न, वाढदिवस, कोर्टाच्या तारखा यासहित सर्व नियोजित यात नोंद केली जाऊ शकते. रिमांडर लावून ठेवल्यास आपल्या सूचनेनुसार तो आपल्याला रिमाइंड करत राहतो. Sync ऍक्टिव्ह केल्यास आपला डाटा मोबाईल बिघडला किंवा बदलला तरी पूर्णपणे सुरक्षित राहतो.
 
Google Keep२) Google Keep - सर्व मोबाइलधारकांसाठी हे अत्यंत उपयुक्त ऍप असून यात कॅटॅगिरीनुसार कामाच्या लिस्ट तयार करता येतात. साध्यासाध्या बाबी सुद्धा यात नोंद करून ठेवल्यास विस्मरण होण्याची अथवा डोक्याला ताण देण्याची गरज उरत नाही. एकप्रकारे माणसाला टेन्शनमुक्त करण्यासाठी हे ऍप उपयोगाचे ठरू शकते. उदा. आपण पुढील आठवड्यात बाजारात जाणार आहात. बाजारातून काय काय आणायचे आहे हे बाजारात गेल्यावर सर्वच्या सर्व आठवेलच असे नाही. म्हणून जे आणायचे आहे त्याच्या नोंदी आठवडाभर करत राहिल्यास चूकभूल होण्याची शक्यता संपते. समजा तुम्ही शेतात आहेत. मजुरांची नावे लिहून ठेवायला किंवा कुणाला पैसे वगैरे दिले असल्यास त्याची नोंद करायला कागदपेन जवळ नाही. घरी जाऊन गेल्यावर सर्व नीट आठवण्याची शक्यता नसेल तर गूगल किपवर सर्व नोंदी घ्या. 
अर्थात हे बहुपयोगी ऍप आहे.
 
google lens३) Google Lens गुगल लेन्स - या ऍपद्वारे आपण कॅमेऱ्याचा वापर करून विविध वस्तूंचे तपशील बघू शकतो. उदा. झाडाच्या पानाचा फोटो काढल्यास त्या झाडाचा पूर्ण तपशील आपल्याला उपलब्ध होतो. तसेच एखादी वस्तू आवडल्यास व ती खरेदी करावयाची परंतु तिचे नाव माहीत नसल्यास त्या वस्तूचा फोटो काढून तिचे पूर्ण नाव, किंमत, ती कोणत्या संकेतस्थळावर किंवा बाजारातील कोणत्या दुकानात उपलब्ध आहे याची माहिती मिळते.
 
Google Translate४) Google translate  - कोणतीही भाषा कोणत्याही भाषेत कॉपी पेस्ट करून रूपांतर करता येते. किंवा आपणास वारंवार गरज पडत नसेल तर ऍप डाउनलोड करण्याची गरज नाही. 
https://translate.google.com/ या लिंकवर क्लिक करा आणि हवे ते भाषांतर करून घ्या. कोणत्याही भाषेचे कोणत्याही भाषेत भाषांतर/रूपांतर करता येते.

kalnirnay


५) कालनिर्णय - मराठी कालनिर्णय सर्व पंचांगसहित असते. म्हणजे कालनिर्णय तुमच्या हातात. जागेवरून उठून भिंतीपर्यंत चालत जाण्याची आवश्यकता नाही. 
 

map

 
६) Navigation - छोटामोठा प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा हे ऍप अत्यंत उपयोगाचे आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, सर्वात चांगला मार्ग कोणता आहे, कोणत्या मार्गावर टोल आहेत यासोबतच पोचण्यासाठी किती वेळ लागेल इथपर्यंत तो जवळजवळ अचूक स्वरूपाची माहिती देतो. रस्त्याने हॉटेल, पेट्रोलपंप सहित अन्य बाबींची माहितीही तो पुरवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे चौपदरी/सहा-आठपदरी चौकातील वळणे घेण्यासाठी याचा बहुमोल उपयोग होतो. OLA Cabs, Uber किंवा अन्य सर्व टॅक्सी कंपन्या हेच ऍप वापरत असल्याने गाडीत बसल्यावर निश्चित ठिकाणी पोचण्यास किती भाडे पडू शकेल आणि किती वेळ लागू शकेल, यांचा आधीच अंदाज येत असल्याने महानगरात अनोळखी माणसाची टॅक्सीवाल्याकडून होणारी फसगत कमी झाली आहे.
 
गेल्या पाच-सहा वर्षांपासून याचा सार्वत्रिक वापर सुरु झाला आहे. पण त्याही आधीपासून म्हणजे जेव्हा याविषयी कुणाला फारसे माहित नव्हते तेव्हापासून मी ही टेक्नॉलॉजी वापरतो आहे. त्यामुळे १० वर्षापूर्वी रात्री २ वाजता कुणालाच न विचारता मी हैद्राबाद शहर पार करून नंदियाल सारख्या दुर्गम भागात सहज पोहचू शकलो आहे. रात्रीबेरात्री कुणाची मदत न घेता संपूर्ण भारतच नव्हे तर नेपाळमध्ये सुद्धा याच तंत्राचा आधार घेऊन सहज फिरून आलेलो आहे. 

Navigationमाझे नाव व पत्ता गुगल मॅपवर उपलब्ध असल्याने जगातील कोणत्याही मनुष्याने नेव्हिगेशन मध्ये गंगाधर मुटे असे दोन शब्द लिहिलेत कि त्याला त्याच्या ठिकाणापासून माझ्या घरापर्यंतचा पूर्ण तपशीलवार मार्ग उपलब्ध होईल. कुणालाही काहीही न विचारता कोणताही व्यक्ती थेट माझ्या अंगणात पोचू शकतो. अर्थात गुगल सर्च मॅप मध्ये लिहिले तरी माझी पूर्ण माहिती सुद्धा कुणालाही सहज उपलब्ध होते.
 

Navigation चे खूप उपयोग आहेत. सर्वच येथे लिहिणे शक्य नाही आणि तशी आवश्यकताही नाही. बस वापर सुरु करा म्हणजे तुम्हाला सर्व अगदी सहजपणे कळायला लागेल. 
याव्यतिरिक्त अन्य खूप महत्वाचे आणि उपयोगाचे ऍप्स आहेत. त्याविषयी अधिक माहिती नंतर बघू.
 
शुभेच्छेसह!
 
- गंगाधर मुटे
=======
Share