![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तो मार्केट मधून घरी गेला अन् डाऴींबाची बाग तोडुन टाकली.
---------------
आजचा अॅग्रोवन मधील लेख वाचुन, नेवासा तालुक्यातील माका गावच्या ( जिल्हा नगर) सुदाम पालवे याने मला वॉटस् अॅपवर एक पोष्ट टाकली व मदतीची अपेक्षा केली. पुर्ण हकिकत जाणून घेण्यासाठी मी त्याला फोन लावला. काय प्रकार आहे म्हणुन विचारले तर तो म्हणाला नगर जिल्ह्यातील राहाता मार्केटला ९६ क्रेट डाळींब पाठवले होते. मार्केटचा व वाहतुकीचा खर्च वजा मला फक्त ८६ पैसे किलो प्रमाणे डाळींबाचे पैसे मिळाले साहेब.
मी: माल चांगला नव्हता का?
तो: चांगला नसता तर इतका खर्च करून, १०० कि.मी. लांब विकायला कशाला नेला असता.
मी: खरेदी करणारे व्यापारी नसतात का तिथे?
तो: तिन चार व्यापारी असतात, माल खुप असतो मग त्या आडत्या कडचेच हमाल व्यापारी असल्याचे नाटक करतात. लिलावाचे नाटक होते. मग तेच व्यापारी, हमाल होउन माल भरायला लागतात.
मी: हमाली किती घेतात?
तो: हमाली वेगळी घेतात, भरई कापली, आमच्या क्रेट मधून त्यांच्या क्रेटमध्ये टाकायचे "पलटी" चे पैसे वेगळे घेतात. सॉर्टींगचे वेगळे वर इतर खर्च घेतात.
मी: सगळ्याच अडत्यांचे हमाल व्यापारी होतात का?
तो: हो जास्त व्यापारीच येत नाहीत मग यांच्या मनाचाच भाव लावतात. त्या दिवशी मी पदरचे पैसे देऊन माघारी आलो साहेब.
मी: तुम्ही तक्रार नाही केली का?
तो: काय तक्रार करता? सगळी यांची मिली भगत आहे.
मी: किती वर्षाची बाग आहे डाळींबाची. सहा वर्ष झालेसाहेब पण ही पट्टी पहिल्यावर जेसीबी लावून उपटून टाकली. वर्षभर आपण कष्ट करायचे खर्च करायचा अन् अशा भावात विकण्या पेक्षा ते नकोच.
लई मरतेत हो शेतकरी बघा तुम्ही तरी काही करता येतं का. तुम्ही आता या विषयाला वाचा फोडली आहे तर करा काहीतरी निट वाकडं........
सुदामने बाग उपटून टकल्याचे ऐकुन खूप दु:ख झाले. बाजार समित्यांमध्ये होणारी लूट थांबवण्यासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
- अनिल घनवट.
(सोबत सुदामची पोष्ट व डाऴींबची पट्टीचा फोटो जोडला आहे.)