नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतामध्ये राबणारा धनी माझ्या पिरतीचा
राब राबुनी पिकवितो तो मोत्याला
ऊन तहान नाही माझ्या राजाला
साथ माझी त्याच्या कष्टाला
दिवसभर राहतो तो शेताला
रात्रीचा घास खातो सोबतीला
शेतामध्ये राबणारा धनी माझ्या मायेचा
तोच आधार माझ्या जगण्याचा
गुरढोर गाई आहे संगतीला
तेच आधार माझ्या परिवाराला
चार पैसा देता माझ्या संसाराला
धनी माझं जाता दूर हो कामाला
शेतामध्ये घर माझ मातीचं
तेच आनंद माझ्या जगण्याच
फाटकी साडी आणि चोळी
धन्याकड नाही पायातली जोडी
तरीपण गातोय सुखी संसाराची गाणी
एकच आहे आमची मागणी
एकच करत आहो आम्ही विनंती
आमच्यासारखे लाखो शेतकरी
घामाचा भाव द्या हो पिकासी
घामाचा भाव द्या हो पिकासी
नाव -औताडे विशाल भाऊसाहेब
९६०४००४१७७
घोटेवाडी , सिन्नर, नाशिक