नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आतातरी शिक
करून रायलोय ती
होय पूर्वजांची शेती
अडाणी असुनही टिकवली
त्यांनी ही काळी माती
विना रसायनाचं पौष्टीक
घरी येत होतं पीक
शेतक-याच्या पोरा
आतातरी शिक
तवा नवता शिकला आजोबा
शिकला नवता तुया बाप
डाक्टरकडे जात नवता
अंगावर आलातरी ताप
अती रसायनाच्या वापरानं
निसर्ग झालाय दुषीत
शेतक-याच्या पोरा
आतातरी शिक
आता थोडंकाही झालंतरी
बोलवा मनते डाक्टर
बैलजोडीचा जमाना नाय
आता घेवू मनते ट्रॆक्टर
सततच्या दुष्काळानं
हातचं चाललया पीक
शेतक-याच्या पोरा
आतातरी शिक
वाढलं शेतीचं उत्पन्न
तुले फायदा कोणता झाला
कर्ज ना उतरलं डोईवरचं
परत तोच काळ आला
पॆकेज देवून खूष केलं
कर्जमाफी करून लीक
शेतक-याच्या पोरा
आतातरी शिक
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!