
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ठरल्याप्रमाणे २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ इस्त्राईल अभ्यास दौरा संपन्न झाला. इजरायल मधील छोट्याशा वास्तव्यात जे काही ऐकायला, वाचायला आणि बघायला मिळाले त्याची आपल्या पूर्वानुभवांशी व सद्यस्थितीशी सांगड घालून भारत आणि इजरायल यांची तुलना केली कि अनेक पैलूवर प्रकाश पडून काही निष्कर्षांप्रत पोचता येऊ शकेल. उण्यापुऱ्या आठ दिवसात समग्र इजरायलचा अभ्यास होणे शक्य नाही याची मला जाणीव आहे. हत्तीचा एक अवयव बघून त्यालाच हत्ती समजण्याचा आततायीपणा सुद्धा उपयोगाचा नाही. शितावरून भाताची परीक्षा या समीकरणाला अनुसरून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थातच प्रारंभीच्या काळात मी जे माझे निष्कर्ष देत आहे ते अंतरिम स्वरूपाचे असून अंतिम टप्प्यात कदाचित निष्कर्षात बदल होऊ शकतो.अधिक सखोल व विस्तारपूर्वक आढावा घेण्यासाठी पुस्तकरुपातच मांडणी करावी लागेल, त्याशिवाय विषयाला न्याय देणे अवघड आहे.
प्रतिक्रिया
इज्राईल दौरा
आम्हीही फार पूर्वीपासून एकत आलेलो आहे इज्राईल यां देशाबाबत !आणि तेथील प्रगत शेतीतंत्रज्ञान आणि नियोजनाबाबत!भारतीय शेतकर्यानी त्यांचे अनुकरन करावे !स्वता स्वावलंबी व्हावे !हे ही सांगण्यात आलेले आहे !परंतू तेथील शेती पीके हवामान आणि भारतीय शेती पिके हवामान ! मुख्य म्हणजे शाशकीय धोरण !या बाबतीत वस्तुनिष्ठपने विवेचन व्हावे ! भारतीय शेतकर्याच्या दृष्टीने कौतूकाचा आणि आदर्शवत असलेला इज्राईल ! आपण पुस्तक रुपान लिहावा असे वाटते
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
चांगले निरीक्षणात्मक अनुभव
चांगले निरीक्षणात्मक अनुभव मांडलेत।
रावसाहेब जाधव (चांदवड)
पाने