Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




IT कार्यशाळा - अभ्यासक्रम - भाग-३

IT कार्यशाळा - अभ्यासक्रम  - भाग-३
 
या कार्यशाळेत दाखल झालेले विद्यार्थी सर्वच स्तरातील असून ज्याला व्हाटसप शिवाय अन्य काहीच वापरता येत नाही अशा पातळीपासून ते ज्याला इंटरनेट तंत्रज्ञानातील बरेच काही जमते.... या पातळीपर्यंत समावेश असल्याने आपल्याला अगदी प्रारंभीच्या स्टेजपासून सुरुवात करावी लागेल. सावकाशपणे एक एक पाऊल पुढे जावे लागेल. जे शिकलो त्याचा पडताळा घेण्याची गरज भासली तर घ्यावा लागेल.
 
विषयाचा आवाका फार मोठा आहे. सर्वच बाबी येथे शिकायच्या/शिकवायच्या म्हटल्यातर ही कार्यशाळा काही वर्षे चालेल. देण्यासारखा इतका वेळ माझ्याकडे आणि तुमच्याकडेही नसल्याने आपण मुख्य-मुख्य आणि गरजेनुसार महत्वाचे असेल तेच त्रोटक स्वरूपात शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर विषयाचा सखोल अभ्यास म्हणजे सैद्धांतिक संगणक विज्ञान (Theoretical computer science) शिकणे सर्वसाधारण लोकांच्या फारसे उपयोगी पडणारे नसल्याने थेट प्रॅक्टिकल स्वरूपाकडे वळून वापराचे तंत्रज्ञान याकडे लक्ष केंद्रित करणे सोयीचे व उपयोगाचे ठरणार आहे. त्यामुळे सिलॅबस ठरवून त्यानुसार वाटचाल करणे उपयोगाचे वाटत नाही. त्याऐवजी ठराविक मुद्यावर लक्ष केंद्रित करून तेच आत्मसात करून लवकरात लवकर ही कार्यशाळा संपवण्याचा प्रयत्न करूयात.

- गंगाधर मुटे 

=======
Share