नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जरा धीर धरा थोडा
(गीतप्रकार)
खिळी काढा जोतं काढा, औत खीनभर सोडा
उन्हं टळेल माथ्याचं, जरा धीर धरा थोडा ||धृ||
औत हाकूया जोमानं, ]पुढं ढेकळं ढेकळं
मागं ढेकळांचा भुगा, जरा सोसा काळ येळं
धरा दाबून रूमण्या, बैल कासऱ्यात ओढा
उन्हं टळेल माथ्याचं , जरा धीर धरा थोडा ||1||
पान्हा फोडाय वासरू, कास पिळाय गवळी
येता हुरड्यात सुगी, लुटे लुटारुंच्या टोळी
पिकातल्या कटाळ्याला घालू पायकुटी आढा
उन्हं टळेल माथ्याचं , जरा धीर धरा थोडा ||2||
मध गोळा करी माशी, त्याचं तोंडामध्ये इकं
कशी राखतीय पोळं जरा तिच्यावानी शिकं
जशात तसं वागायला करा सुळ्या दातदाडा
उन्हं टळेल माथ्याचं , जरा धीर धरा थोड ||3||
उभ्या भरल्या कणसा देता नरडीला ईळा
वर मोगरीचा मार खाली जीव चोळा मोळा
बस मुक्यान जगण आता तरी वाचा फोडा
उन्हं टळेल माथ्याचं , जरा धीर धरा थोडा ||4||
तुम्ही शेंगदाण्यावाणी आम्ही वर टरफलं
आम्हा अंगातोंडा माती तुम्ही आतं लालेलाल
नातं मातीशी सांगता चव कुमट थोबाडा
उन्हं टळेल माथ्याचं , जरा धीर धरा थोडा ||5||
- संजय आघाव परळी वै.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने