Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***प्रश्न फक्त वायदेबंदीचा नाही

*प्रश्न फक्त वायदेबंदीचा नाही*
~ अनिल घनवट

कृषिप्रधान भारत देशाला कृषी धोरणच नाही याची प्रचिती वारंवार येत आहे. जो सत्ताधारी पक्ष असेल तो आपल्या सोयीनुसार व इच्छेप्रमाणे धोरणे ठरवत आहे व राबवत आहे. ही सर्व धोरणे शेवटी शेतकऱ्याला मारक ठरत आहेत. शेतकरी गरीब, कर्जबाजारी होत शेवटी आत्महत्या करत आहे तरी 'मायबाप सरकार' शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात कसूर करत नाही.

*वायदेबंदी*
देशातील शेअरबाजार व कमीडिटी मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी, Securities and Exchange Board of India (SEBI) ही संस्था काम करते. कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक व व्यापार करणाऱ्यांची आर्थिक सुरक्षा, या व्यापाराला प्रोत्साहन व व्यवहारांचे नियमन करणे हे सेबीचे मुख्य उद्देश. सेबी तशी म्हणायला स्वायत्त संस्था आहे मात्र तिच्या कारभरावरून तसे काही दिसत नाही.
सन २०२२ मध्ये सेबीने नऊ शेतीमलावर वायदे बाजारात व्यापार करण्यास, डिसेंम्बर २०२२ पर्यंत बंदी घातली होती. कोरोना काळात निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे महागाई रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असे समजू या. जानेवारी २०२३ पासून सर्व पिकांचे वायदे सुरळीत सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र सेबीने, डिसेंम्बर २०२३ पर्यंत गहू, तांदूळ, चना, मूग, सोयाबीन व त्याचे उपपदार्थ, मोहरी व त्याचे उपपदार्थ व कच्चे पमतेल या सात शेतीमलांवर वायदे बाजारात व्यापार करण्यास बंदीला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे वरील सर्व शेतीमालाचे दर पडलेलेच राहतील. महागाई कमी करण्यासाठी सरकारने सेबी मार्फत हा निर्णय वायदेबाजारावर लादला आहे. याचा फटका थेट शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच शेतीमालाच्या वायदेबाजार चालवणाऱ्या NCDEX या कंपनीला कामच राहिले नसल्यामुळे प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे व कदाचित बंद ही करावी लागेल अशी परिस्थिती आहे.
वायदे बाजार हे पुढील तीन चार महिन्यात संबंधित शेतमालाचे दर अंदाजे काय असतील हे दर्शवणारी यंत्रणा आहे. यामुळे व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या व सरकारला सुध्दा खरेदी विक्रीचे निर्णय घेता येतात. शेतकरी आपला माल ठराविक किमतीला आगोदरच हेजिंग करून विकू शकतो. शेतमालाच्या किमतीची आगाऊ सूचना देणारी यंत्रणाच बाद केल्यामुळे व्यापारी कमीत कमी दराने खरेदी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना सोसावा लागतो.
वायदेबंदी करून सरकार महागाई आटोक्यात आणायचा प्रयत्न करते पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासात असे निष्पन्न झाले आहे की वायदेबंदी करून महागाई नियंत्रणात फार काही परिणाम होत नाही. फक्त महागाई कमी करण्यासाठी सरकार काहीतरी करते आहे दाखवण्यासाठी सरकार असे निर्णय करते. याचा मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. हरभऱ्याचे दर तर आधारभूत कीमती पेक्षा कमी राहिले आहेत तरी वायदेबंदी का? असा प्रश्न उपस्थित होतो. गहू , हरभरा, मोहरीच्या कापणीच्या हंगामात लादलेली वायदेबंदी शेतकऱ्यांना बरीच मारक ठरणार आहे असे दिसते.

*निर्यातबंदी*
निर्यातीतून परकीय चलन मिळवण्यात कृषी क्षेत्र सध्या अग्रेसर राहिले आहे. मात्र यात सुद्धा सरकारी हस्तक्षेपाणे बाधा आणली आहे. आज गहू, तांदूळ, सर्व तेलबिया, सर्व कडधान्यांवर निर्यातबंदी आहे. युक्रेन युध्दा मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान निर्माण करण्याची संधी असताना निर्यातबंदी लादून या सर्व शेतीमालाचे भाव पडले आहेत व दुसरीकडे ८० कोटी जनतेला मोफत अन्न धान्य पुरवले जात असल्याची फुशारकी मारली जात आहे. शेतीमाल व्यापारात सरकारचा हस्तक्षेप हा प्रश्न महत्वाचा आहे.

*आयात शुल्कमुक्त आयती*
भारतातून बाहेर शेतीमाल पाठवण्यास मज्जाव केला जातो वर शून्य आयात शुल्कावर आयती केला जात आहेत. याचा परिणाम आता कापणीला आलेल्या तुरीवर झाला आहे, हरभऱ्यावर होणार आहे. एकीकडे आत्मनिर्भर होण्याच्या गोष्ठी करायच्या व दुसरीकडे भाव पडून शेतकऱ्यांना त्या पीका पासून दूर ढकलायचे, काम सरकार करते आहे हा सुद्धा प्रश्न गंभीर आहे.

*तंत्रज्ञानबंदी*
जगाच्या बाजारपेठेत भारताचा शेतकरी स्पर्धाक्षम व्हावा यासाठी शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणे आवश्यक आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातील एकरी शेतीमालाची उत्पादकता तीन ते चार पटीने कमी आहे. ती बरोबरीत आणायची असेल तर जी एम तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. आयात केलेले खाद्यतेल, पेंड, कडधान्ये जी एम तंत्रज्ञान वापरून तयार केले आहेत. ते आपण खातो त्याला बंदी नाही मात्र देशातील शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वपरायला बंदी हा काय प्रकार आहे हे समजण्या पलीकडे आहे. प्रश्न तंत्रज्ञानबंदीचा सुद्धा आहे.

*कर्जाचा विळखा*
भारतातील शेतकऱ्यांवर असलेल्या बंदीच्या बेड्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. शेतीमालाला भाव मिळू द्यायचा नाही या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्यांची काही चुक नसताना बँका आज शेतकऱ्यांच्या जमिनीवर ताबा घालत आहेत. शेतकरी देशोधडीला लागत आहे. प्रश्न फक्त वायदेबंदीची नाही, सर्वच शेतीमाल व्यापारातील हस्तक्षेपाला आहे, त्याच्या भयानक परिणामांचा आहे.
शेतकरी संघटित नाही, सरकारे पाडू शकत नाही अशी सर्वच पक्षांची धारणा झाली आहे म्हणून शेतकऱ्यावर अत्याचार करायला ते घाबरत नाहीत. शेतकऱ्यांना जर या दुष्टचक्रातुन बाहेर पडायचे असेल तर आपली संघटित ताकद दाखवावी लागेल. शेतकरी विरोधी धोरणे राबणाऱ्या पक्षांना सत्तेतून पायउतार करण्याची क्षमता तयार करावी लागेल तरच वायदेबंदी, निर्यातबंदी, आयती, तंत्रज्ञानबंदी सारखी हत्यारे वापरून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याची हिम्मत सत्ताधारी करणार नाहीत.
१९/०१/२०२२

अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पार्टी.
९९२३७०७६४६

Share