Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***तू स्वतःला गुंतवावे..! : भाग - ४

लेखनप्रकार : 
साठीचे हितगुज
वाङ्मयशेती: 
वाङ्मयशेती
आयुष्याच्या रेशीमवाटा
साठीचे हितगुज
साठीचे हितगूज : भाग - ४
तू स्वतःला गुंतवावे..!

वयोमानानुसार शरीर कितीही वृद्ध होवो पण मनाला ताजेतवाने ठेवायचे असेल तर मनाला सतत गुंतवून ठेवण्यासाठी नवे नवे मार्ग चोखाळावेच लागतील. साठीच्या आधी जे केले, जसे केले, आपण जसे जगलो त्या व्यतिरिक्त वेगळे काहीतरी नव्याने करावे लागेल. मोकळ्या केसांत स्वतःला गुंतवणे क्षणभंगूर असते पण वैश्विक कार्यात स्वतःला गुंतवणे चिरंजीव-शाश्वत असते हा मानवी जीवनाचा गुरुमंत्र चढत्या वयात शिकायचा राहून गेला असेल तर निदान उतरत्या वयात तरी शिकावा लागेल. दर दिवशी, दर क्षणाला मनाला नव्या नव्या अनुभूती द्याव्या लागतील आणि हे अजिबात अवघड नाही. एकदा काहीतरी करायचे ठरवले तर जगाच्या पाठीवर करण्यासारखे आणि शिकण्यासारखेही खूप आहे. संगीतापासून ते संगणकीय तंत्रज्ञानापर्यंत आणि शेतीपासून ते उद्योग-व्यापारापर्यंत काहीही करणे सहज शक्य आहे. आणखी एक फरक लक्षात घेतला पाहिजे की शिकणे आणि शिकवणे यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. शिकवण्यामुळे ज्ञानदान अवश्य होते पण मनाची अवस्था कुंठल्यागत होते. याउलट शिकण्याची उमेद मनाला भरारी मारण्यास प्रवृत्त करते.

 
मला वाटते कि या बाबतीत मी बराच नशीबवान आहे. शिकण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी मला जाणीवपूर्वक फारशा उठाठेवी कराव्या लागल्या नाहीत. मी वयाच्या पन्नाशीत जी कामे करत होतो ती सर्व कार्ये आजही कायम आहेत, जशीच्या तशी कायम आहेत आणि सोबतीला पुन्हा नव्याने काही कार्य वाढत आहेत. यात प्रामुख्याने नव्याने निर्मित होत असलेल्या दोन कंपन्यांचा उल्लेख करावा लागेल. पहिली ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. आणि दुसरी युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. त्यात आणखी भर म्हणून सोबतीला युगात्मा शरद जोशी स्मारक व शरद जोशी ग्लोबल ग्रंथालय हे दोन संकल्पही आहेतच. एकंदरीत उर्वरित आयुष्य अपुरे पडेल, वय संपेल पण कामे संपणार नाही इतकी कामाची व्याप्ती माझ्यासमोर श्रीदत्त म्हणून उभी आहे.
 
तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी मंडळींसोबत मी इजरायलला गेलो होतो. तिथे एक सहज विषय निघाला की शेतीचा अभ्यास करायला म्हणून अनेक लोक इजरायलला येतात आणि अभ्यासाऐवजी पर्यटन करून परत जातात. इजरायल अभ्यास दौरा पूर्ण केल्यानंतर आपल्या राज्यात जाऊन राज्यातील शेतकऱ्यांसमोर इजरायलचा शेतकरी किती कर्तबगार आहे याचे पोवाडे गात बसण्याशिवाय आणि इस्रायलच्या शेतकऱ्यांकडून शेतीतंत्रज्ञान शिकण्याचे सल्ले देण्याशिवाय कुणीही काहीही करत नाहीत. अशा स्थितीत निदान आपण तरी इजरायलमध्ये केलेल्या अभ्यासाचा उपयोग करून राज्यात असे काहीतरी करून दाखवले पाहिजे की जे अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श मॉडेल ठरू शकेल.
 
मायदेशात परतल्यानंतर राज्यातील विविध भागातील इजरायल रिटर्न शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. ही कंपनी स्थापन केली. कंपनीची नोंदणी झाली, प्रमाणपत्र हाती पडले आणि पुढील प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करायची वेळ आणि कोरोना आगमनाची वेळ एकच आल्याने आमचे एक वर्ष व्यर्थ गेले. त्यातही योगायोगाने एक गोष्ट चांगली झाली. याच काळात महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प घोषित करून अंमलबजावणी सुरु केल्याने आम्हाला आयतीच संधी उपलब्ध झाली आणि बीजोत्पादन व विपणनाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करता आला. प्रारंभिक प्रस्ताव दोन कोटी रुपयाचा असला तरी भविष्यात या उद्योगाचा विस्तार करायला प्रचंड वाव आहे. 
 
होतकरू आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी मिळून ही कंपनी स्थापन केल्यामुळे राज्यातील विविध भागातील प्रतिनिधी संचालक मंडळावर आहेत. विविध भागातील शेतकरी संचालक मंडळावर व सभासद असणे हे कंपनीचे शक्तीस्थळ आहे. शेतकरी उत्पादक ते थेट शेतकरी ग्राहक अशी मूल्यवर्धित शृंखला तयार करण्याची आमची योजना असल्याने पक्का माल वितरित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही आमच्या कंपनीचा राज्यभर विस्तार केलेला आहे. कृषी विभागाचे श्री मोरे साहेब व श्री कापसे साहेब तसेच पर्यटन विभागाचे श्री सोळांकुरे साहेब इजरायल दौर्‍यात मार्गदर्शक म्हणून आमच्या समवेत होते.  त्यांच्याच मार्गदर्शनामुळे शेतकरी सुद्धा उद्योग उभारू शकतो असा आत्मविश्वास मिळाल्याने सर्वांचे मनोबल वाढून कंपनीची निर्मिती व पायाभरणी झाली. 
 
शेतकऱ्यांची पावलोपावली अडवणूक व मुस्कटदाबी करणाऱ्या ऐदी आणि लाचखोर अधिकाऱ्यांची संख्या शासकीय यंत्रणेच्या कृषी विभागात भरपूर असली तरी मनमिळावू, शेतकऱ्यांच्या सेवेस तत्पर व निस्वार्थी असणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या देखील कृषी विभागात कमी नाही. आम्ही भाग्यवान आहोत की पदरचे पैसे खर्चून स्वखर्चाने आमच्यापर्यंत येऊन कंपनीला मार्गदर्शन करणारे अधिकारी आम्हांस मिळाले. श्री मोरे साहेब व श्री कापसे साहेब मदतीसाठी सदैव उत्सुक असतात, वेळोवेळी ऑनलाईन मिटींगला उपस्थित राहून मार्गदर्शन करित असल्याने येत्या काही काळात ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लवकरच नावारूपास येईल अशी आशा नव्हे, तर आम्हांला खात्री आहे.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
 
=-=-=-=
एकोणवीस/तीन/बावीस
=-=-=-=
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी Fingure-Right http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

Agrison

=-=-=-=-=

Share