नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुःख वावराचे.......
देश शेतकऱ्यांचा हा
याची वेगळी कहानी
बळीराजाच्या हातात
फक्त उरतात नाणी ।।
सा-या जगाचा पोशिंदा
त्याचं मातिमोल जिनं
त्याच्या हृदयात वसे
राष्ट्रभक्तीचं रे लेणं ।।
शेत पंढरी रे त्याची
पिकांमंदी रे विठ्ठल
सा-या पृथ्वीचं पाणी
त्याच्या डोळ्यात आटलं ।।
टोपी गहाण पडूनी
सावकाराच्या त्या घरी
सरकार दलालांचं
कशा उजवाव्या पोरी ।।
तडा काळजाला देई
भेगाळलेला दुष्काळ
एका चितेसंग फूटे
सा-या कुटुंबाचा भाळ ।।
त्याच्या डोळ्यांत बघून
लेक लपवितो दोर
लढू धैर्याने म्हणतो
लावू नका जिवा घोर ।।
लेक आसवं गिळते
कधी मागे ना ती काही
शेतीमातीशी रे नातं
तिच्या रक्तामध्ये वाही ।।
काय गुन्हा असा केला
जन्म कुणब्याचा दिला
त्यांच्या नशीबाचा असा
खेळ दैवाने मांडला ।।
देवा शेतक-या पोटी
जन्म एकदा तू घेरे
दुःख डोंगराएवढे
थोडे सोसून पहारे ।।
शेतकऱ्यांच्या जातीला
नाही कुणीच रे वाली
फाटलेली काळीजं रे
केली तुझ्याच हवाली.....
:-कवी अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(कवी, निवेदक व लेखक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
Copyright - Aniket J. Deshmukh
Email Id :-
anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने