नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भास तू, ध्यास तू, श्वास तू
काळजाची खुळी आस तू
आसवांना दिसू दे जरा
की निघालास जाण्यास तू
फार होतेय लडिवाळणे
खूप घेतोस रे त्रास तू
गुंतता मी गळाला तुझ्या
प्राक्तनाला मिळालास तू
दागिने अन्य काही नको
श्लेष, दृष्टांत, अनुप्रास तू
ओढ डोळ्यास का लागते
का मला वाटतो खास तू
कोण आहेस तू सांगना
धावते बोल प्राणास तू
चूक माझी अशी कोणती
"अभय" घेतोस वनवास तू
- गंगाधर मुटे
------------------
प्रतिक्रिया
भास तू, ध्यास तू, श्वास तू
https://www.facebook.com/gangadharmute/posts/4011814825509842
शेतकरी तितुका एक एक!
भास तू, ध्यास तू, श्वास तू
भास तू, ध्यास तू, श्वास तू
काळजाची खुळी आस तू
ही गझल सुद्धा चोरी गेली आहे. आज सहज बघायला गेलो तर १०-१२ चोरटे सापडलेत.
https://www.facebook.com/vijaya.more.794/posts/1916597378620139
https://www.facebook.com/.../a.16373573.../1886873344868858/
https://www.facebook.com/.../a.14767662.../1748792155343235/
चोरट्यांना चोरीच्या शुभेच्छा.
शेतकरी तितुका एक एक!
सुंदर
Dr. Ravipal Bharshankar