नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळीराजा
काळ्या मातीत राबतो
सा-या जगाचा पोशिंदा
राब राबुनियां काढी
काळ्या मातीत कशिंदा
काळ्या मातीत राबूनी
दु:ख मनाला सांगतो
उभे पीक करपता
जीव झाडाला टांगतो
माझ्या पोटासाठी जगी
रात- दिवस जागतो
बळीराजा यासृष्टीचा
त्याला आयुष्य मागतो
त्याला छळते रोजच
त्याच्या मागे आसमानी
पीक त्याच्या हाती येता
व्यवस्थेची सुलतानी
टाळेबंदी च्या काळात
बळीराजा ना थाबंला
गती जगाची थाबली
जगासाठी तो राबला
- दत्ता वालेकर
छत्रपती शिवाजी चौक,
घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड
dattawalekar@gmail.com
मो. 9421440922
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने