नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पोसता कांदा…
पोसता कांदा वावरभर
मातीमध्ये दाटत गेला
फुगून छाती मल्लाची
कपडा जसा फाटत गेला...
पातीतून हिरव्या नाचऱ्या
उद्यासाठी पोसत गेला
गाडी गाडी भरताना
गळा फास काचत गेला...
वाटेवर बाजाराच्या
हिशोबाने सोबत गेला
हवा भरल्या चाकांनाही
कचाकचा दाबत गेला...
उंबऱ्यावरच बाजाराच्या
भाव त्याचा पड़त गेला
खाटे होताच वावर माझे
पडता भाव चढत गेला...
सोबत त्याच्या जगणाराचे
आभाळ मात्र सडत आहे
कळत नाही अजून मला
कोण त्याला नडत आहे...
रावसाहेब जाधव (चांदवड)
9422321596
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!