![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कर्जमाफी
..................................
लक्तरे ही फास आहे
जीवनाची आस आहे
माय काळी थोर माझी
कूणब्याची आस आहे
जाहला गंधीत सारा
सोनियाचा घास आहे
गाय व्याली हर्ष द्वारी
क्षीरवीना कास आहे
साज सारा ही बढाई
कर्जमाफी भास आहे
.............................................
*प्रा. डॉ. राजेंद्र गवळी*
कुकाणा ता.नेवासा जि.अहमदनगर
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.