नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
माफ करा साहेबांनो
सांभाळा जी सुभा
थोडेतरी जगण्याची
असू द्या की मुभा …
कलमाला कायद्याच्या
जडलीया बाधा
पैशाविना प्रेतालाही
देतो कोण खांदा…
नवसाचा देवालाही
आता घम नाही
गायसुध्दा चाऱ्याविना
पान्हावत नाही…
तळाशीला फायलीच्या
योजनेचा भुगा
ताकदीच्या तलाठ्याच्या
आभाळाला भेगा…
दम नको भरू बाबा
घायकुती येऊ
खळ्यातली मोडू सुडी
वाटा तुला देऊ…
गावकीत भावकीच्या
जाळताना बागा
जोगलेत किती तुम्ही ?
कानामंधी सांगा…
नशिबाने उरावर
उरे एक बिघा
कागदात कुणब्याच्या
घाला दोन रेघा…
रावसाहेब जाधव ( चांदवड)
(9422321596)
७०, महालक्ष्मी नगर,
चांदवड, जि.नाशिक ४२३१०१
rkjadhav96@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने