शुभहस्ते पुजा : अभंग ।।५।।
प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥
सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥
त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥
हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥
लबाड लंपट । तयांची जमात ॥
माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥
पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥
मन किटाळले । कैसे नाही ॥४॥
म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥
अभयास वाटे । शंका तशी ॥५॥
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
#माझी_वाङ्मयशेती #अभंग #अभय #गंगाधर_मुटे
*************
प्रतिक्रिया
सत्ताधारी हस्त कशाला रे?
सत्ताधारी हस्त कशाला रे? हाच प्रश्न मी भगवंताला ७-८ वर्षांपूर्वी विचारला होता.
यंदा त्याने माझे मताला दुजोरा देऊन अंमलबजावणी केली.
म्हणतात ना, पांडुरंगजी के यहा देर होता है; अंधेर नही।
~~~~~~
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2065869596771051
शेतकरी तितुका एक एक!
फेसबूक लिंक
फेसबूक लिंक
https://www.facebook.com/photo?fbid=1645257662165582&set=a.1645257612165587
पाने