![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(मतला)
लक्ष काही देत नाही कोणते सरकार.
आण या राज्यात आता आपले सरकार.
(हुस्नेमतला)
आफतीचा अंत नाही हे कसे सरकार
संकटाचे नाव दुसरे होय हे सरकार.
(१ ला शेर)
कीव कोणी घेत नाही या मनोराज्यात,
झोपलेल्या माणसांचे झोपले सरकार.
(अंतिम शेर)
धोरणाने शासनाच्या खूप केले हाल,
पण तरीही झेलतो का हे असे सरकार?
(मक़ता)
होत नाही हे सरळ मी सांगतो 'रविपाल',
शेपटी कुत्र्याप्रमाणे वाकडे सरकार.
°°°
वृत्त: आस्त्रवीणी
(गालगागा गालगागा गालगागा गाल)
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
शेपटी कुत्र्याप्रमाणे वाकडे सरकार हे
बढिया गझल. डॉ साहेब...!!!
धन्यवाद भाऊ
खूप खूप आभार
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने