नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा..२०१७
पद्यलेखन ..वृत्तबध्द कविता
॰॰॰॰॰॰॰॰॰॰
स्पर्धेसाठी
विषय..शेतकरी आत्महत्या
॰॰॰॰॰॰॰
दगड धोंडेच वाट्याला
कसा नाही, सुखाचा वाहिला वारा, घरीदारी
कधी नाही, मिळाली गाढ विश्रांती, मनोहारी
मनोभावे, जरी कष्टा, दगड धोंडेच वाट्याला
मुलाबाळा, कसे पाहू, कसे रेटू, प्रपंचाला ?
हिरे मोती, नको काही, जरा पोटा, मिळो भाकर
सुखाच्या पावलांना का, दिसेना आमुचे हे घर
तसा प्रत्येक वर्षाला, अता दुष्काळ ठरलेला
सदा का आडवे येते, असे दुर्दैव नशिबाला ?
कुठे का सांगता येते, अशा लहरी, निसर्गाचे
कुणी वाली, नसे आम्हा, करी जो चीज घामाचे
भरोसा ना, निसर्गाचा, अतीवर्षा कधी नाही
बदलती रोज नेते अन, तयांचे राजकारणही
कुठे क्रांती ? कधी प्रगती ? किती हे दुःख आम्हाला
महागाईत पिचतो ना, खुषी का आत्महत्येला ?
डॉ. शरयू शहा, मुंबई
9619023330
॰॰॰॰॰॰॰॰॰॰
प्रतिक्रिया
छान
सुंदर काव्य!
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!