नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आई
ती गेल्यानंतर मजला
'कोणी नाही' कळले
आयुष्य माझे सारे
समिधा होऊन जळले
जळली स्वप्नफुलेही
अक्रोशीत नेत्र वितळले
मज पदोपदी वाटेवर
श्वासाने निर्दय छळले
घडली पुढ्यात पापे
रक्त न कधी उसळले
मिसळले कशामध्ये ते ..
कुणीकडे ते वळले ...?
या शब्दांना मी माझ्या
जगतावर उगा उधळले
कधी उष्टावल्यावरी मी
कवितेने मला विसळले
'ती नाही ' म्हणूनी माझे
प्रारब्धच अवघे मळले
मी फिरता माझ्यामधुनी
अस्तित्त्व तिचे आढळले
प्रतिक्रिया
सुरेख. आर्तता प्रकट झाली आहे
सुरेख. आर्तता प्रकट झाली आहे कवितेतून.
शेतकरी तितुका एक एक!
पाने