नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शीख न मुसलमान न कोणताही हिंदू आहे
शेतकरी हा व्यवस्थेचा, केंद्रबिंदू आहे
भूक लागली की सर्वप्रथम ही हवी भाकरी
पोट भरल्यावर मग, माजलेला मेंदू आहे
जाईल कशी ना? ही दैना, जाईल! पण तरी..
कठीण आहे जोपर्यंत जनता भोंदू आहे
पार हरलो गं मी तुझ्या या कौतुकाने हरलो
तारा, कपूर, मृगशिरा? कोण तू इंदू आहे !
संस्कृतीचं बोलायचं म्हणजे सद्या भारतात
अमेरिकन संस्कृती आहे! कुठे सिंधू आहे ?
एका पंगतीत पाहिले, लोकं जेवत होते
अन्नाला झेलत असे जसा तो गेंदू आहे
सभ्यतेची सुरूवात शेतीपासून झाली
माती अन मतीचा हा बेजोड बिंदू आहे
प्रतिक्रिया
nice...
nice...
पाने