नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
वृक्षाचे दुख
आज थोडे आश्चर्य घडले,
"मी का जगलो "
याच मला दुख वाटते ,
अस वृक्ष माझ्याशी बोलले .
काय झाले बाबा ?
तुझा महिमा काय वर्णू ?
पर्यावरण ..फर्निचर
आणि बरच काही ...तरीही ....मी म्हटले .
आणि तुझ्या वाढीसाठी
आम्ही सारे किती झटतो,
झाड लावा ...,झाड जगवा नारा देतो
,वृक्षारोपण...संगोपन काळजी किती घेतो ..
तुझी छाया..जणू माउलीची माया मानतो
तरी तुला काय झाले ?
वृक्ष उदासपणे म्हणाला ,
हे सारे ठीक आहे,,
पण उन्हाळा येतो ,
आणि जीव कासावीस होतो .
नापिकी ....कर्जबाजारीपणा
साऱ्याला बळीराजा कंटाळतो ,
आणि साऱ्यांना जगवणारा अन्नदाता,
माझाच आधार घेत जीव देतो .......
आणि मी जिवंतपणी
मरणयातना भोगतो ............
सुवर्णा अशोक जाधव
प्रतिक्रिया
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
पाने