नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भाषणात बोलला नेता !!
सातबारा तारण माझा, शेत सारे कर्जात आहे !
भाषणात बोलला नेता, बळीराजा सुखात आहे !!
शेतमालास भाव नाही, इथे ना मोल भावनांना !
थकीत कर्जदार बँकेचा, माझे नाव बुकात आहे !!
भाषणात बोलला नेता, बळीराजा सुखात आहे ॥
गोठ्यात गाय उपाशी, ना घास मिळे मजला !
प्रचारात रोज मात्र , मी त्यांच्या मुखात आहे !!
भाषणात बोलला नेता, बळीराजा सुखात आहे ॥
इथे दुष्काळ पाचवीला, कधी फेरा गारपिटीचा !
दोष ना देतो कुणाला , मी भोगतो प्रपात आहे !!
भाषणात बोलला नेता, बळीराजा सुखात आहे ॥
आनंदात जगतो मी, सहानुभूती नको रे तुमची !
कर्जमाफीची ना अपेक्षा, हमीभावा मागतो आहे !!
भाषणात बोलला नेता, बळीराजा सुखात आहे ॥
© श्री. राहुल दत्तात्रय राजोपाध्ये
1073, नरसोबा गल्ली, तासगाव
ता. तासगाव जि. सांगली
9130215836
rdrajopadhye@gmail.com
प्रतिक्रिया
भाषणात बोलला नेता !!
अप्रतिम गझल थेट मनाला भीडली
रवींद्र अंबादास दळवी
नाशिक
धन्यवाद
आपले खूप खूप धन्यवाद ! आपल्या सारख्या तज्ञ लोकांकडुन मिळालेली दाद खूप सुखावून जाते
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने