नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
=== धर्मामिटर ===
जसा असतो थर्मामिटर, तसाच असतो धर्मामिटर॥ध्रु॥
प्रत्येकाची श्रध्दा सुध्दा, प्रत्येकाचा असतो ताप।
परलोकातला जायचा दोर,ईहलोकातला होतो साप॥
सापाला काबुत ठेवण्यासाठी,पाजा दुध दोन दोन लिटर...१...
धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव।
ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥
धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२...
भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार।
आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥
जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३...
प्रत्येकाच्या जातिचं पाणी, जातं शेवटी समिंदरात।
पण पहिल्यापासुन हऊसेनी भरतात,टाक्या मात्र घराघरात॥
पाण्याचं बाष्प करावयाला,सांगा लाऊ कोणता हिटर?...४...
पराग दिवेकर...........
प्रतिक्रिया
सामाजिक आशयाची छान कविता. धृ
सामाजिक आशयाची छान कविता.
धृ - dhRu
दुसर्यावर - dusaRyaawara
हौसेनी - hausenee
असे लिहावे.
शेतकरी तितुका एक एक!
पाने