Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



प्रतिक्षा

लेखनप्रकार: 
कथा
लेखनविभाग: 
अनुभवकथन

नागेश टिपरे
मु.पो.खडकी ता.दौंड
जि.पुणे४१३१३०
nageshtipare.blogspot.com

प्रतिक्षा
पिंपरी नावाचं एक आटपाट नगर होतं. त्या गावात एक शेतकरी राहत होता, त्याचं नाव होतं हौशिराम. तसा हौशिराम कष्टाळु होता, त्यातच त्याच शिक्षण ही कमी झालं होतं. म्हणुन त्याला वाडवडिलांची शेतीकरण्या शिवाय दुसरा पर्यायचं नव्हता. तो तसा त्या काळ्या धरणीमाय वर जीवापाड प्रेम करायचा.
वैषाख महिन्याचं ऊन हळुहळु कमी होऊ लागलं होतं. कधी मधी वार-कावार पण सुटत होतं. त्या वेळे पर्यंत हौशिराम ने आपल्या शेतीची सगळी मशागत पुर्ण केली होती. मशागती साठी तो संपुर्ण ऊन्हाळ बायकां-मलांसह व पाखऱ्या-हिऱ्या बरोबर राब राब राबला होता. इतर बळीराजा प्रमाणे त्याची ही नजर आता त्या मिरगाच्या पहिल्या पावसा कडे होती. गेल्या दोन वर्षाचा दुष्काळ संपावा या आशेने त्याने शिवारातील सर्व देव-देवतांना निवद नारळ पण केला होता. हळुहळु दिवस सरू लागले पण त्या बळीराजा च्या काळजाची आग काय त्या मेघराजाला दिसली नव्हती.
इकडे हौशिराम ने घेतलेल्या सावकाराच्या कर्जाचा डोंगर मात्र वाढतचं चालला होता. मागील दोन वर्षात घेतलेले कर्ज अजुन काय फेडण झालं नव्हतं, पण काय तरी जमवा जमव करून तो दर महिन्याला सावकाराचं होणार व्याज मात्र नित्य नेमाणे चुकवत होता. ऑगष्ट महिना संपत आला पण पावसाने काय तोंड दाखवले नव्हते. अनं कधी तो यायचा पण कोल्ह हुक दिल्यासारखा निघुन जायचा. कधीतरी येणाऱ्या या कोल्ह हुक पावसा मुळे सर्वच शेतकऱ्यांच्या मनाला आस लागुन बसली होती, की एकदाचा का होईना पाऊस पडलं. परतीच्या पावसाचे दिवस पण निघुन गेले पण पाऊस काय पडला नाही. हौशिराम ने लावलेली तुर व कपाशी सुकुन गेली होती. त्याने आता कपाशी वेचायला सुरवात केली. जास्त काही नाही पण जेमतेम खर्च निघल एवढचं उत्पन्न झालं. तुर तर काढायला सुद्धा परवडनार नव्हती, पण करणार काय, तेवढचं चार पैस म्हणुन तुर पण काढुन घेतली त्यात दीड पोती तुर झाली.
दिवाळी समोर येऊन ठेपली होती शेतातील काही कामे सुरू झाली. दिवाळी साठी हातात पैसा उरला नव्हता, म्हणुन हौशिराम सावकाराकडे गेला अनं मागल्या कर्जाच्या बदल्यात आरसाडाचं शेत सावकाराला लिहुन दिलं, आणि नविन कर्जाची मागणी केली. तसा सावकार ही कणतं-कुततं तयार झाला. पण हे फक्त दाखवाया पुरतेच होते, त्याच ही या व्यव्हारातं फावलं होतं. मनातील मनसुभा तर साबित झाला होता. अनं मन ही मन तो खुष होता कारण त्याच्या ईष्टेटीत आणखी भर पडणार होती. त्याला वाटायचं दर वर्षी दुष्काळ पडावा आणि गावकऱ्यांनी माझ्याकडं कर्जाला यावं. या वर्षी निम्म्य पेक्षा जास्त लोक हे सावकाराचे कर्जबाजारी झाले होते. कुठुन ही पैसा मिळत नसल्याने सावकार म्हणेल त्या अटीला तयार होत.
रब्बीचा हंगाम सुरू झाला पण म्हणावं तशी ओल ना शेताला ना त्याच्या हाताला होती. जेमतेम पैशाची जमवाजमव करून जेमतेमचं शेतकऱ्यानी पेरण्या केल्या. त्यात ही त्यांच्या हाताला काही लागलं नाही. यात थंडीचे दिवस कसे निघुन गेले हे कळलं सुद्धा नाही. या वर्षी ऊन्हाळा लवकरचं जाणवु लागला. ऊनाचे चटके बसु लागले. सर्व काय बळचं चालावं तस सर्व काय चाललं होतं. गावचा उरूस जवळ येऊ लागला. गावकरी उरूसाच्या तयारीला लागले. उरूसावा सर्वांनी ग्रमदैवतेची पुजा केली. या वर्षी तरी पाऊस पडु दे म्हणुन गावातील लहांना-थोरांनी देवाला दंडवत घातलं. देवाचा कोप आता तरी जाईल अनं पाऊस पडलं या आशेवर शेतीची कामे करू लागली.
हौशिराम ने ही पाखऱ्या-हिऱ्या बरोबर नांगर धरला. या वर्षी लय पाऊस पडणार म्हणुन नागंरणी वरचे गाणे गावु लागले. मोठ मोठे ढेकळ मागे पडु लागले. आठ दिवसात सर्व शेत नांगरूण झालं. पावसाचे दिवस जवळ येऊ लागले तसातसा हौशिराम च्या काळजाचा चुकतो की काय आशी अवस्था होऊन बसली होती.
पण देव काय या वर्षी पण पिंपरी गावावर प्रसन्न व्हायचा दिसतं नव्हता. या वर्षी पण पाऊस ने गेल्या वर्षी सारखाच तग धरला होता. जसा पाऊस तग धरत होता तसा सावकार खुष होतं होता. या वर्षी वरूण राजा खुपच कठोर बनाला होता. जनावरे सुद्धा चारा पाण्या वाचुन तरफडु लागली. शेतातल्या नांगरटीची शिग सुद्धा मोडली नव्हती. जमिन नाही पिकली म्हणन काय झालं पण माणसाच्या पोटात उसळणारी भुकेची आग काय शांत होणारी नव्हती. ती होणारी आग अनं जनावरांची तरफड बघुन तो सावकाराच कर्ज काढतचं होता. या वर्षी मात्र गावातील पाटिल, देशमुख, यांच्यासारखी मोठ-मोठे शेतकरी सावकाराच्या कर्जाचे शिकार बनले होते.
या वर्षी पाऊसचा एक थेंब ही पडला नव्हता. दिवाळी ही सुनी-सुनीच निघुन गेली. बघता बघता संक्रांत जवळ आली ऊनाच्या झळा जणवु लागल्या होत्या. आशाच एका संध्याकाळी गावातील मंडळी देवळात बसली होती. त्यातच एक जाणता म्हाणुस म्हणाला
"पाऊस नाय पडला तर पयल्या काळात सार द्याव पण्यात डुबायला ठेवायची रीत होती पण आता कोण मानतो ही गोष्ट".
त्याच्या त्याच्या या बोलान गावकऱ्याना थोडा दिलासा मिळाला. गावच्या उरसात देव डुबायला ठेवायचं ठरलं. सर्वांबरोबर हौशिराम ने ही सहमती दर्शवली. ठरल्या प्रमाणे उरसाच्या दिवशी गावातील सर्व देव गोळा केले अनं तीन दिवस पाण्यात ठेवले आणि चौथ्या दिवशी बाहेर काढुन दही दुधाने अभिषेक केला. गावातील मंडळी आता सर्वा खुष वाटु लागली. या वर्षी पाऊस पडनारच या वर ते ठाम होते. सर्वांनी शेताच्या कामाला सुरवात केली. काहींचे जनावरे बैल या दुष्काळात दगावले होते , त्यांनी कुदळीने खणुन शेतीची मशागत केली.
पावसाळ्याचे दिवस जवळ येताच सुर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला वाहन बेडुक. म्हणजे भरपुर पाऊस पडाणार याची ती लक्षणे होती. पण देवाच्या काळजाला काय अजुन पिंपरी गावातील लोकांची साद पोहचली नव्हती. हौशिराम ने उरली सुरली जमिन पण सावकाराकडे घाण ठेवली होती. पाऊस काय पडायच नाव घेत नव्हता. त्याने हौशिराम चा जीव कासावीस व्हायचा. आता तर जमीन सुद्धा जाणार याने तो तीळतीळ तुटायचा. त्या या विचाराने नीट झोप सुद्धा येत नव्हती. तो क्षण भर स्वताःच्या नशिबाला दोष द्यायचा तर क्षण भर या देवाला आशाच एका रात्री विचारा तो इतका गुंतत गेला की त्या सकाळ झालेली ही कळाली नाही. या विचारातच तो सकाळ होताच थेट शेतात गेला दुरवर पसरलेलं शेत पाहुन त्याच मन गहिवरून आलं, काही वेळ तो तसात स्तब्ध बघत उभा राहीला. चालत चालत तो गोठ्यापाशी आला पाखऱ्या-हिऱ्या वरून एकदा मायेन हात फिरवला. गोठ्यासमोरच असलेल्या वैरणीचा उरला सुरला पालापाचोळा गोळा करून त्याच्या पुढ टाकला, व गावकडची पावले चालु लागला. चालता चालता तो एकदम थांबला आणि पुन्हा एक वेळ कटाक्ष नजर पाखऱ्या-हिऱ्या वर टाकली. डोळ्यातील आश्रु पसुन तो थेट देवळात आला. देवाला एक वेळ नमस्कार केला, आणि हातातील कासऱ्याने देवळातच गळ्याला फास लावला. फास जसा आवळत गेला तसा तसा तो हात पाय खोडु लागला. जीभ चार बोट बाहेर आली होती अनं डोळ्यात रक्त उतरलं होतं.
हौशिराम ने फाशी घेतली!!!!
हौशिराम ने फाशी घेतली!!!!
गावभर एकच चर्चा सुरू झाली. सुर्य हळुहळु ढळु लागला, त्याची किरणे मंदावु लागली. काळ्याकुट ढगांनी गर्दी होऊ लागली अनं क्षणार्धात पावसाने जोर धरला. एका शेतकऱ्याची शेतीच्या तळमळी मुळे केलेली आत्महात्या पाहुन वरूण राजा सुद्धा आता रडु लागला होता

Share

प्रतिक्रिया