नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आभाळ कोसळलं
राबतो आम्ही मातीत काळ्या
येवून अवकाळी नासवलं सार
न्याय असा कसा रे तुझा
उभ्या पिकांवर कोसळला मुसळधार
असा काय गुन्हा आमचा
आली उपासमारीची पाळी
झालं होत्याच नव्हतं
सांग कशी साजरा करू दिवाळी
झाली नसती नासाडी
पडले असते चार दाणे पदरात
जगलो असतो सुखानं
सारी स्वप्न गेली पाण्यात
नको आम्हा असे जुलूम
ओल्या दुष्काळाचे
काळ्या आईची लेकरं आम्ही
सोड निसर्गा असे छळायचे
नाही तारले तू आम्हाला
झाला पिकांचा ऱ्हास
जातील कसे हे दिवस
आवळला गळ्याला तू फास
होत्याच नव्हत झाल
नाही कुठून भरवसा मदतीचा
सारं आभाळ कोसळलं
नाही वाली कुणी कुणाचा
गणपत गणगोपलवाड
परळी वै जि. बीड
मो. ९६५७८२०२०२
प्रतिक्रिया
छान रचना
छान रचना
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने