Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शरद जोशींची किल्ली कुलुपा पर्यंत पोहोचू द्या

*शरद जोशींची किल्ली कुलुपा पर्यंत पोहचु द्या*
- अनिल घनवट
दि . २९ एप्रिल रोजी अॅग्रोवन मध्ये प्रकाशीत झालेला लेख वाचुन मुळ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. संघटनेच्या कार्यकर्त्यां बद्दल केलेली गलिच्छ तुलना व स्व. शरद जोशीं बद्दल केलेले आक्षेपहार्य विधान या रोषाला कारणीभुत ठरले आहे. उपसंपादक रमेश जाधव यांनी केलेले लिखान हे अपुर्या माहितीवर, शेतकर्यांची दिशाभुल करणारे व खोडसाळपणे केले आहे असे माझे मत झाले आहे.
या लेखाची मुद्दे निहाय चर्चा करू या. जाधवांच्या लेखनाची प्रेरणा कुणा एका शेतकरी संघटनेच्या तथाकथित "मोठ्या" कार्यकर्त्या बरोबर झालेल्या गप्पांतुन मिळालेली आहे. शेतकरी संघटनेत काही काळ शरद जोशीं बरोबर काम केलेले, पराभुत मनस्थितीचे अनेक कार्यकर्ते पुण्यात फिरत असतात. शरद जोशी हयात असताना व पुर्ण जोमाने किल्ला लढवत असताना हे कार्यकर्ते संघटनेला सोडुन गेले आहेत. त्यांच्याशी झालेल्या संभाषणा वरुन जाधवांनी संघटनेच्या सद्य परिस्थितीचे मुल्यमापन केले अाहे हेच मुळात चुकिचे आहे.
वृंदावनातील विधवा, त्यांना शरद जोशी कळले नाहीत, धर्मदाय व देणगीवर गुजरण चालू आहे असे विधान कशाच्या आधारावर केले आहे? कार्यकर्त्यांनी कधी कोणाकडुन कशाची अपेक्षा केली? संघटनेत आजही सर्वच कार्यकर्ते आपल्या लेकरा बाळाच्या तोंडचा घास काढून संघटनेसाठी खर्च करतात हे त्यांना कसे समजणार? ज्यांनी पुर्ण हयात शरद जोशीं बरोबर घालवली, त्याना शरद जोशी नाही समजले मग पोटाची खळगी भरण्यासाठी वर्तमान पत्राच्या कार्यालयात कारकुनी करणार्यांना समजली का?
व्हि. पी. सिंहांनी कोरा चेक देऊ केला होता व शरद जोशींनी तो फेटाळला पण शरद पवारांच्या मध्यस्थीने राजिव गांधींशी "तडजोड" केली असे म्हणणे हे निव्वळ खोडसाळपणाचे आहे. कार्यकर्त्यांनी फोन वर या बाबत जाब विचारला तेव्हा जाधव म्हणाले की १९८९च्या निवडणुकीत शरद जोशींनी , जनता दलाचा उमेदवार नसेल तेथे कॉंग्रेसला मतदान करण्यास सांगितले. हा आणखी एक जाधवांचा जावई शोध. १९८९ च्या निवडणुकी आगोदर शरद जोशींनी राज्यव्यापी जातियवाद विरोधी यात्रा काढली होती. त्यावेळे जातियवादाचे विक्राळ संकट राज्या पूढे उभे राहताना दिसत होते. निवडणुक प्रचार संपण्याच्या दिवशी, नागपुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत, एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, ज्या ठिाकणी जनता दलाचा उमेदवार रिंगणात नसेल व फक्त जातियवादी पक्षाचा व कॉंग्रेसचा उमेदवार समोरा समोर असतील तर तुम्ही कोणाला मतदान करायला सांगणार? या प्रश्नाला उत्तर देताना शरद जोशी म्हणाले की जातियवाद्या पेक्षा कॉंग्रेसला मतदान करावे. ही भुमिका त्या वेळेस, त्या परिस्थितीत योग्यच होती. व महाराष्ट्रात फक्त नऊ ठिकाणी असे उमेदवार समोरा समोर होते. याच्यासाठी शरद पवारां बरोबर जाउन काही षडयंत्र रचले नाही. परिणामांची तमा न बाळगता आपल्या भुमिकेशी प्रामाणीक राहणे हा जोशी साहेबांचा स्वभाव होता. आंबेडकरां सारखे ध्रुविकरण आपल्याला शक्य झाले नाही हे जाहीरपणे कबुल करण्याची दानत या नेत्यात होती.
शेयकरी संघटना राजकीय पक्ष म्हणुन उभी राहू शकली नाही हे खरे आहे, म्हणजे ती कधीच यशस्वी होणार नाही असे नाही. आज सत्तेत असलेल्या भा. ज.पा.ला १०० वर्ष लागली. स्व. भा. प. चे वय २५ वर्षाचे असेल. राजकीय यश मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत व २०१९च्या विधान सभेत तुम्हाला परिणम दिसतीलही.
शेतकरी संघटनेचा अजेंडा कम्युनिस्टांसहित इतर राजकीय पक्षांनी पळवला हा तर शरद जोशींच्या विचाराचा विजय आहे. खुली व्यवस्था आली तर देश व शेतकरी बरबाद होइल असे म्हणणारे जर संघटनेचा अजेंडा घेउन चालणार असतील तर ही शेतकरी संघटनेने फिरवलेली देऊळे आहेत असे समजा. जागतिकिकरणाचे ' रोमॅंटिक' चित्र शरद जोशींनी उभे केले पण शेतकर्यांची आवस्था अधिक बिकट झाली असे म्हणतात. जागतिकीकरण शेतकर्यां पर्यंत पोहोचलेच नाही हे रमेश जाधवांना ठाऊक नसावे. जर खरच जागतिकीकरण, इतर क्षेत्रा प्रमाणे शेतीत १९९१ सालीच आले असते तर खरच शरद जोशींनी रंगवलेले रोमॅंटिक चित्र आपल्याला आज अनुभवायला मिळाले असते. शेतकर्यांची अजची बिकट परिस्थिती ही जागतिकीकरणामुळे नाही तर जागतिकीकरणा पासुन वंचित ठेवल्यामुळे झाली आहे हे सर्व तज्ञ आज मान्य करत आहेत.
गावोगाव शेतकरी संघटनांचे पीक आले आहे हे खरे आहे. आपले उपद्रव मुल्य दाखवून त्याची किंमत वसुल करणार्या काही संघटना आहे हे ही मान्य पण त्यात मुळ संघटनेला गोवू नका. ही संघटना आजही त्यागाच्या पायावर उभी आहे.
संघटना ट्रस्ट म्हणुन काम करते आहे, मुळ कार्यक्रमा पासुन भरकटली आहे असे रमेश जाधव कशाच्या आधारावर म्हणतात समजले नाही. शरद जोशींच्या मालमत्तेचे ट्रस्ट झाले. त्याचा प्रत्यक्ष मैदानात काम करणार्या संघटनेशी काहीच संबंध नाही. ही माहिती बहुतेक त्या "मोठ्या" नेत्यानेच जाधवांना पुरविली असणार व जाधव लेख लिहुन मोकळे झाले. मान्य आहे की काही काळ शेतकरी संघटनेच्या कामात शिथिलता अाली असेल पण डिसेंबर २०१६ नंतर शेतकरी संघटना नव्या दमाने झेप घेत आहे व हजारो तरुण कार्यकर्ते संघटनेला जोडले जात आहेत याची खबर त्या मोठ्या नेत्याला नासावी म्हणून जाधवांना ही नाही.
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व रघुनाथ दादा पाटीलां बद्दल सुद्धा त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या बद्दल मला काही बोलायचं नाही. ते सत्य असेल कदाचित म्हणुन त्यांच्या कार्यकर्तंयांनी काही प्रतिक्रिया दाखवली नाही पण रघुनाथ दादा हे शरद जोशींचा वारसा पुढे नेणारे जुने जानते नेते आहेत हे जरा खटकलेच. ते जुने जानते आहेत हे मान्य पण शरद जोशींचा वारसा पुढे नेणारे नक्कीच नाहीत. तसे असते तर त्यांनी, समाजवादी घाटणीच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजंवणिचा आग्रह धरला नसता. उत्पादन खर्च ५०% हमीभावाची मागणी रेटली नसती. कर्जमाफी व मोफत विजेची भिक मागितली नसती. सुकाणू समितितील त्यांची समाजवादी दोस्ती जगजाहीर अाहे.
खुलीव्यवस्था म्हणजे कॉर्पोरेट्सला जगभरातल्या शेतीचा ताबा हवा आहे हा जाधवांचा तारे तोडणारा समाजवादी अंदाज आहे. शेतकर्याला स्वतंत्रय असले तर तो ठरवील स्वत: शेती करायची का कॉर्पोरेट कंपनीचा भागधारक होउन नफा कमवायचा. हे विधान शेतकर्यांची दिशाभूल करणारे आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्सची भिती आम्हा शेतकर्यां पेक्षा तुमच्या सारख्या कारकुनी करणार्यांना जास्त आहे. शेतकरी त्याही परिस्थितीत समर्णेथपणे तोंड देइल, त्याची भिती दाखवून शेतकर्यांना पुन्हा समजवादी पिंजर्याकडे पाठवण्याचे पाप करू नका.
शेतकरी - बिगर शेतकरी ही दुफळी आमच्या संघटनेत कधीच नव्हती. तुमचे प्रबोधन करणारा मोठा नेता सुद्धा बिगर शेतकरीच असावा त्याला विचारा असे द्वंद शेतकरी संघटनेत कधी होते का? संघटनेतील अनेक कार्यकर्ते बिगर शेतकरीच आहेत. शेतकर्याच्या खिशात पैसा आला तर त्याची क्रयशक्ती वाढुन अौद्योगिक उत्पादनाला मागणी वाढेल, उद्योग वाढतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, शेतीवरचा भार कमी होइल व सर्वच सुखी होतील हा संघटनेच्या विचाराचा गाभा आहे.
अल्पभुधारक शेतकर्यांचे प्रश्न सामुहिक शेती करुन सुटणार नाहीत. त्यासाठी पहिले शेती फायद्याची होणे आवश्यक आहे. शेतीमालाचे दर पडण्याचे अधिकार देणारे, शेतकर्याला शेतीत अडकवून ठेवणारे, व्यापार - तंत्रज्ञानाचे स्वतंत्रय नाकारणारे कायदे संपवल्या शिवाय हे शक्य नाही. शरद जोशींनी अनेक वर्षा पासुन परिशिष्ट ९ रद्द करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मुळ शेतकरी संघटना हे काम नेटाने करीत आहे. येत्या काही महिन्यातच शेतकरी संघटनेची ताकद काय आहे ती आपल्याला दिसेल. व अॅग्रोवन च्या पहिल्या पानावर ही बातमी तुम्हाला छापावी लागेल यात तिळमात्र शंका नाही. मग तुम्हाला भेटलेल्या "मोठ्या रुदालीला" ती दाखवा जाधव साहेब.
कार्यकरत्यांनी आपल्याशी फोनवर संवाद साधताना दोन प्रश्न आपण सातत्याने उपस्थित करत होतात. एक, तूर हरभर्याची खरेदी सुरु नाही , संघटना काय करते? शासकीय खरेदी जास्त प्रमाणात सुरु होउन हे तिसरे वर्ष असावे. सुरुवातीच्या काळात संघटनेने आंदोलने करुन खरेदी केंद्रे सुरु केली पण शेतकर्यांना या प्रचंड मनस्ताप झाला व अनेकांचे अद्याप पैसे मिळाले नाहीत. लोक न्यायालयात गेलेत. मुळात अशा पद्धतीने हमी किंमत ठरावी व सरकारने सगळा शेतिमाल खरेदी करावा या व्यवस्थेलाच आमचा विरोध आहे. व आता केंद्र सुरु झाले तरी शेतकरी तिकडे फिरकत नाहीत कारण सरकारकडचे पैसे मिळतील की नाही या बाबत शेतकर्यांव्या मनात शंका आहे. माल सरकारच्या पदरात टाकणेही सोपे नाही, पैसे दिल्या शिवाय काहीच होत नाही हे शेतकर्यांना माहित झाले आहे व सरकार फक्त एक्सपोर्ट क्वालिटी मालच घेते (FAQ) उरलेल्या धान्याचे काय करायचे हा शेतकर्याला पडलेला प्रश्न असतो म्हणुन शेतकर्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
दुसरा प्रश्न , अनिल घनवट यांनी सुकाणू समिती का सोडली? आगोदर त्यांना स्वामिनाथन मान्य होता मग नंतर का सोडली?
पुंतांब्यातुन संपाच्या अंदोलनाच्या बातम्या येऊ लागल्या. त्यांच्या मागण्याही वर्तमान पत्रातुन समजत होत्या. पत्रकार विचारू लागले की शेतकरी संघटना या संपात सामिल होणार का तेव्हा मी नगरला पत्रकार परिषद घेतली. माझ्या नावाने, ' संप योग्य पण मागण्या चुकिच्या ' अशा मथळ्याच्या बातम्या माझ्या नावाने लागल्या. किसान क्रांतीच्या नेत्यांना त्यात सुधारणा कराव्यात यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले पण अचानक प्रसिद्दीच्या झोतात आलेले नविन कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुढे मुख्यमंत्यांनी त्यांना गुंडाळले वगैरे पण संपुर्ण कर्जमुक्तीसाठी आमची संघटना संपात राहिली व संघटनेच्या कार्यकरंत्यांनी प्रामाणिक पणे काम केले. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावर व माझ्या मुलावरही दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
किसान क्रांतीचा फज्जा उडाल्या नंतर बंडखोरी करुन बाहेर पडलेले अजित नवले सुकाणू समितीचे नेते झाले. मला सुकाणू समितीत येण्याचे निमंत्रण आले. नासिकला पहिली बैठक झाली तेव्हच मी सांगितले की याच मागण्या असतील तर या समितीत राहण्यात मला रस नाही. तेव्हा अजित नवले यांनी ८ तारखेच्या बैठकीत आपण मागण्या दुरुस्त करू असे अश्वासन दिले. ८ जून १७ तारखेची बैठक आम्हाला टाळुनच घेतली. दरम्यान राजू शेट्टी, रघुनाथ दादा, जयंत पाटील , छावा, संभाजी ब्रिगेड व चित्र विचित्र नावाच्या नवनव्या संघटना मिळून ३५ संघटनांची सुकाणू समिती तयार झाली होती. समितीच्या मागण्या काय असाव्यात याचे लेखी पत्र तयार करुन माझ्या लेटर हेडवर माझ्या सहीनिशी मी अजित नवले यांना दिले आहे . ( प्रत सोबत जोडली आहे). अजित नवले यांनी " या मागण्या लोकप्रिय झाल्या आहेत आता बदलता येणार नाहीत" असे सांगितले तेव्हाच मी सुकाणू समिती सोडल्याचे जाहीर केले. दिव्य मराठीने व काही वर्तमान पत्रांनी त्या बातम्या छापल्या आहेत. एका वाहिणिवर झालेल्या चर्चेत मी चुकिच्या मागण्यांना समर्थन देणार नाही म्हणुन बाहेर पडत असल्याचे सांगीतले. मी कधीही स्वामिनाथन किंवा हमीभावाची मागणीला पाठिंबा दिलेला नाही व देणार ही नाही. जाधव माझ्याबद्दल कार्यकर्त्यांना खोटे सांगुन माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यू ट्यूब वर कोणत्या व्हिडिअोत मी समर्थन केले आहे याची लिंक पाठवा असे आव्हान एका तरुण कार्यकेत्याने जाधवांना केले व माझ्यावर पुर्ण विश्वास व्यक्त केल्याचे जाधवांनी एकले आहे.
एकुनच जाधवांचा लेख हा अल्प माहितीवर, त्याचे संघटने बद्दलचे त्रोटक ज्ञान व "मोठ्या " नेत्याच्या चर्चवर अाधारीत सर्वच संघटनांची बदनामी करणारा आहे. स्व. शरद जोशीं बाबत लिहिताना "तडजोड" हा शब्द खोडसाळपणे वापरुन आमच्या भावना दुखावल्या अाहेत. रमेश जाधव यांची लिखानाची शेैली सुरेख आहे पण ती शेतकर्याच्या हितासाठी वापरली तर बरे होइल.
शरद जोशींच्या किल्लीने हे कुलुप उघडणार नाही हा जाधवांचा अंदाज चुकिचा व शेतकर्यांची दिशाभूल करणारा आहे. शेतीची व देशाची आर्थिक समस्या केवळ शरद जोशींच्या किल्लीनेच उघडणार आहे फक्त त्या कुलुपा पर्यंत ही किल्ली पोहोचू द्या. तुम्ही आडवे येऊ नका ही विनंती.
३०/०४/२०१८
अनिल घनवट.
अध्यक्ष, शेतकरी संघटना.
Show quoted text

मा. संपादक,दै. देशोंन्नती,
अॅग्रोवन मध्ये रमेश जाधव यांनी छापलेला लेख आपण देशोन्नती मध्ये पुनर्मुद्रित केला आहे. सदर लेखाला मी दिलेले उत्तर सोबत जोडले आहे. ते अॅग्रोवन प्रमाणे आपल्या दैनिकात छापावे वीनंती.

आपला विश्वासू,
अनिल घनवट.
अध्यक्ष, शेतकरी संघटना.
Show quoted text

Share