नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अरे उपकार केलेले असे विसरायचे नव्हते
तुझ्या तू नाव बापाचे खरे लपवायचे नव्हते
किती कष्टून बापाने बियाणे पेरले होते
तिथे गाजर गवत भलते आसे उगवायचे नव्हते
उन्हाळे सोसले त्याने तुला छायेत ठेवाया
अता छायेत गाणे तू उन्हाचे गायचे नव्हते
मला तू द्यायचे होते खुले आव्हान युद्धाचे
परी बोंडात राहुन या, अळी तू व्हायचे नव्हते
तुझा-माझा नव्हे केवळ, जगाचा बाप आहे तो
कुण्या जातीमधे त्याला..कुणी बांधायचे नव्हते
- आत्तम गेंदे,
पालम, जि.परभणी
9420814253