नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवेत घे समस्ता, अन्य काही नाही
हीच खरी कवीता, धन्य काही नाही
नेऊन घाल सारं, देवी- देवतांना
व्यवहारीक येथे, मान्य काही नाही
निहत्था मी आलो, माणसाच्या पोटी
पहा पाठीमागे, सैन्य काही नाही
कर्मच सिद्ध माझे, "घेणे तेची पेरं"
सिद्धान्त का खातो ? धान्य काही नाही !
जे जे असेल दुःख, ते ते सर्व माझे
शेतकऱ्यांपेक्षा गं, दैन्य काही नाही
एकटी तू आहे, एकटा मी आहे
दोघे मिळून पूर्ण, शून्य काही नाही
अस्पृश्य जनांना भीमाने स्पर्श केला
या उपर अम्हाला, पुण्य काही नाही