![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
निशब्द या भुईला, कंठ फुटण्याची वाट आहे
नशिबी तिच्या पिलांच्या, स्मशानघाट आहे
जुलूमी त्या ठगांना, सांगावे काय आता?
डोक्यावरी तयांच्या, फेट्याचा थाट आहे
राब राब राबून, देह वाकले कुणाचे
अन् दारी कुणाच्या, भरभराट आहे
हातात झेंडे देऊन, रंगी अन् बिरंगी
कुणासाठी आली, कुणाची लाट आहे
फासावरी उपाशी, लटकण्यास सज्ज व्हावे
नभात निजण्यास, चांदण्यांची खाट आहे
हुकूमी त्या एक्कयांचे, सारेच शिक्के खोटे
'झिंगाट' झाली राजसत्ता,कारभार 'सैराट' आहे
राजेश जौंजाळ पोहणा जि.वर्धा
*************************
प्रतिक्रिया
सूंदर
खुप छान!
Dr. Ravipal Bharshankar
डाँ.भारशंकर सर,आपले खूप आभार.
डाँ.भारशंकर सर,आपले खूप आभार.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!
खूप खूप आभार, मुटे सर
पाने