नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी साहित्य संमेलनाच्या विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धेसाठी कविता
साज सृष्टीचा
पांघलीय हिरवा
वसुंधरा हा साज
श्रावणाचाच मास
भासे स्वर्ग आज
हरिताची तृणपाती
वाऱ्याने लवलवती
शिवाराची पिके ही
खुशीनेच डोलती
मिळाले कष्टाचे ही
बळीराजाला फळ
राहील सुखात तो
येऊनी दंडात बळ
ढवळ्या पवळ्यांची
खिल्लार जोड गोळी
उधळती लाल माती
बेंदरास खाती पोळी
सणावारांनी नटलेला
सजला श्रावण मास
आया बहिणींचा हा
लाडका झाला खास
टप टप करत वाजती
पावसाचे टप्पोरे टिंब
भिजुनी जलधारात
झालेत सारेच चिंब
कौलारावरी पागोळ्या
ओघळती धारा खाली
काळ्या कुट्ट मेघांची
पडली ढगाळ सावली
उधाणला तुफान वारा
वाहतो सुसाट सळसळ
तरारली पर्णपत्रे पोपटी
ओढे नद्यांची खळखळ
बेडकांचा डराव डराव
नादही चालतोय भारी
सोडती पाण्यात नावा
चिमुकली मुले ही सारी
आल्यात पाऊस धारा
बरसत खाली सरसर
झुळझुळ ओढे नाले
वाही खळाळ झरझर
सौ.भारती दिलीप सावंत
खारघर ,नवी मुंबई
9653445835