नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घेऊ नको फाशी .....!
तुझ्या डोईवर हाय कुटुंबाचा भारं
घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं // ध्रु //
आेटी भर तिची हि मायाळू रे शेती
याच मातीत उद्या उगवतील मोती
मनी धर हिम्मत अन् मानू नको हारं
घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं //१//
ठेवू नको भरोसा कोणत्याही शासनावरं
स्वाभिमानी बांधा तुझा राब शेतावर
तूच या जगाचा आहेस पालनहार
घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं //२//
अर्ध्यावरच सोडू नको संसाराची साथं
तुझ्या जाण्याने होतील चिमुकले अनाथ
तुझ्या मुडद्याचा नेते मांडतील बाजारं
घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं //३//
मजुरीला जावं लागेल सोडून शिक्षण
सोनुलीचं कोण मग करणार लगीन ?
बाप आसतो कुटुंबाचा खंबीर आधार
घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं //४//
एक दिन येईल बळीराजाचं सरकार
पेटी पुरता तुझा होणार नाही रे वापर
वाढून तुझी कीर्ती निघेल सोन्याचा धूरं
म्हणून घेऊ नको फाशी लेकरं होतील बेजारं . //५//
बा. सो. कांबळे
परळी वै. जि . बीड
मो.9860806747
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!