Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कार्यक्रमपत्रिका : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन

|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने | रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
|| जेव्हा चहूदिशांनी | वादळ विराट तेव्हा | 
द्यावे अभय दिव्याला | जळण्यास लेखणीने ||

   akrawe shetkari sahity sammelan १४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर         sharad joshi

शेती अर्थ प्रबोधिनी द्वारा आयोजित 
१४ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर
दिनांक : शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ फेब्रुवारी, २०२६  
स्थळ : युगात्मा शरद जोशी विद्यानगरी,

स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर
दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा 
 
-=- कार्यक्रमपत्रिका -=-

कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, स्वराज्य मुकुटमणी, प्रतापगड परीसर, दाभे मोहन, महाबळेश्वर, जि. सातारा येथे दोन दिवसीय १४ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 

कार्यक्रमपत्रिका आराखड्याचे प्रारूप तयार झाल्यानंतर उपलब्ध केले जाईल.

: कार्यक्रमाची रुपरेषा :
शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६
 
सकाळी ०८.३० ते ०९.३० : अल्पोपहार
सकाळी १०.३० ते ११.०० : अग्रीम नोंदणी केलेल्या प्रतिनिधींना प्रवेश पास वितरण 
सकाळी ११.०० ते १२.०० : ग्रंथ दिंडी
दुपारी १२.०० ते १.०० भोजन
दुपारी ०१.०० ते ३.०० : उद्घाटन सत्र
दुपारी ०३.०० ते ४.३० : कवी संमेलन 
दुपारी ०४.३० ते ५.०० : चहापान
सायंकाळी ५.०० ते ६.०० : परिसंवाद
सायंकाळी ६.०० ते ६.३० : कथाकथन
रात्री ७.०० ते ८.०० : सांस्कृतिक कार्यक्रम
रात्री ८.०० ते ९.०० : भोजन
 
======
रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६
 
सकाळी ०८.०० ते ०९.०० : अल्पोपहार
सकाळी ९.०० ते १०.०० : चर्चासत्र 
सकाळी १०.०० ते ११.०० : गझल मुशायरा 
सकाळी ११.०० ते ११.३० : चहापान
 सकाळी ११.३० ते १.०० : समारोप
 दुपारी १.०० ते १.३० : भोजन
 
======
Ad प्रतिनिधी नोंदणी पद्धत  Ad

https://baliraja.com/rep-regd

Ad कार्यक्रमपत्रिका Ad

https://baliraja.com/kp14

Ad  नियोजन  Ad

https://baliraja.com/14-Ni

Share

प्रतिक्रिया

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 22/01/2026 - 21:24. वाजता प्रकाशित केले.
    प्रति,
    मा. गंगाधरजी मुटे
    १४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, महाबळेश्वर 
     
    सप्रेम नमस्कार,
       आपण २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर येथे संपन्न होणाऱ्या १४ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, त्याबद्दल व्यक्तिशः आपले व संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी धन्यवाद. ह्या गौरवाचा मी सानंद स्वीकार करतो. हा सन्मान स्वीकारताना मला निश्चितच आनंद होतोय. हे संमेलन एका वैचारिक बांधिलकीतून, भूमिकेतून जन्माला आलंय. ते अनेक लिहित्या हातांना लिहिण्यास, व्यक्त होण्यास प्रेरित करतेय, ही गोष्ट मला खूप थोर वाटते. ह्या चळवळीशी, संमेलनाशी आरंभापासून मला जोडता आलं, ह्याचा आनंद व अभिमान वाटतो. सोबतच ह्या विचारपीठावर आपल्या सर्वांना डोळस भूमिका देणारे, शेतकऱ्यांचे पंचप्राण आदरणीय शरद जोशींनी पहिल्यांदा अध्यक्षपद भूषविले असल्याने मनात एक प्रकारचं आदरयुक्त दडपण आहे. साहित्य चळवळीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचा विचार प्रवाहित करणारे अनेक महत्वाचे साहित्यिक, समीक्षक ह्या संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. ही परंपरा खूप समृद्ध, उज्वल अशी आहे. ह्या उज्वल परंपरेचं निश्चित असं 'भान' मला आहे. अशा एका महत्त्वाच्या विचारपीठावर राबत्या शेतकऱ्याचा, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मुलगा म्हणून अनुभवलेलं भावविश्व व्यक्त करताना आनंद वाटेल. शेतकरी चळवळीचा, साहित्याचा अभ्यासक, समीक्षक म्हणून शेती, शेतकरी चिंतन मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले पुनश्च धन्यवाद. यशस्वी संमेलनाच्या आयोजनास खूप साऱ्या मनस्वी शुभेच्छा !
     
    प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, 
    लातूर.
    *********
    मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत, 
    लातूर

    सप्रेम नमस्कार,
    आपण आमच्या विनंतीला मान देऊन संमेलनाध्यक्षपदाचा स्वीकार केला याबद्दल अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार! 
     
    - गंगाधर मुटे

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने