नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गझल...!!
फिर्याद एवढी की जगण्यात भान ठेवा
माणूस माणसाच्या ठेवा समान ठेवा...!
ज्यांना हवीच आहे फुकटात आत्महत्या
त्यांनी इथे जराशी ...शेती गहाण ठेवा..!
स्वर्गास देखण्या जर जाणून घ्यायचे तर
ठेवा तुम्ही प्रियेच्या.. बाहूत जान ठेवा..!
दुनिया जळून सारी होईल भस्म येथे
काबूत वाढणारे... हे तापमान ठेवा..!
दु:खास पेलणारा .....येथे हरेक अश्रू
मोत्यासमान असतो इतुकेच भान ठेवा..!
फसवायचे जगाला कौशल्य पाहिजे तर
ओठात फक्त साखर नेत्यासमान ठेवा..!
मारोती मानेमोड..
9960484863
प्रतिक्रिया
सुरेख गझल
सुरेख गझल
शेतकरी तितुका एक एक!
वा दा
क्या बात है ......
शेती गहाण ठेवा....
वास्तव शेर ! ! !
राजीव मासरूळकर