माहीत काय आहे नावात या करोना.
झालेत सर्व वेडे नादात या करोना.
बंदिस्त गाव केल्या गेले तरी परंतू,
काही करून शिरला गावात या करोना.
मुस्काट बांधले मी अन हात धूत बसलो,
हे कर्म खूप केले काळात या करोना.
सोडून काम धंदा बसलो घरात पण मी,
बेरोजगार झालो वादात या करोना.
होईल तर न आम्हा संसर्ग हा कदाचित,
आहेत लोक अजुनी धाकात या करोना.
पुर्वी समान आता उल्हास दिसत नाही,
आली अति निराशा लोकात या करोना.
आता जगून काही होणार लाभ नाही,
झाल्यात आत्महत्या रागात या करोना.
गरदन कशी सुटावी हा यक्ष प्रश्न आहे,
सारेच जन लटकले फासात या करोना.
वातावरण पसरले सर्वत्र अवदशेचे,
आली तुफान मंदी देशात या करोना.
मालास शेतकीच्या उरला उठाव नाही,
बरबाद शेत झाले रोगात या करोना.
'रविपाल' संपलेली नाही मुळीच व्याधी,
आहे अजून बाकी जगतात या करोना.
• गझलकार •
डॉ. रविपाल भारशंकर
हिंगणघाट, जि. वर्धा.
प्रतिक्रिया
वा अप्रतिम
खुप छान गझल
धन्यवाद!
खूप खूप आभार महेश !
Dr. Ravipal Bharshankar
व्वाह..
हा एक नविन संवाद, करोना...!
Narendra Gandhare
धन्यवाद!
धन्यवाद गंधारेजी
Dr. Ravipal Bharshankar
जबरदस्त गझल डॉ. साहेब !
करोनाचा संपूर्ण इतिहास भूगोल, अतिशय संक्षिप्त परंतू प्रभावी मुद्दे मांडून प्रस्तुत केला आपण या गझल द्वारे. मस्त-छान
धन्यवाद!
आभार आपले प्रदिप भाऊ
Dr. Ravipal Bharshankar
लेखनस्पर्धेत ही सर्वात मोठी
लेखनस्पर्धेत ही सर्वात मोठी गझल रचना ठरावी.
सुंदर आणि विस्तारपुर्वक मांडणी.
हो राजेश
खरेच
Narendra Gandhare
धन्यवाद!
आभार आपले गंधारेजी आणि राजेश
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !
आभार आपले सर
Dr. Ravipal Bharshankar
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 3 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण